इस्त्रायलमध्ये बॉनफायर उत्सवात चेंगराचेंगरी; ४४ जणांचा मृत्यू

इस्त्रायलमध्ये बॉनफायर उत्सवात चेंगराचेंगरी; ४४ जणांचा मृत्यू

इस्त्रायलमध्ये बॉनफायर उत्सवात चेंगराचेंगरी; ४४ जणांचा मृत्यू

कोरोनामुक्त झालेल्या इस्त्रायलमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी बॉनफायर या धार्मिक उत्सावाचं आयोजन करण्यात आलं. या उत्सवाच्या दरम्यान हजारोंची गर्दी जमली. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या चेंगराचेगंरीत आतापर्यंत ४४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत.

इस्त्रायलमधील माऊंट मेरॉन या ठिकाणी बॉनफायर उत्सव पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा झाले होते. या उत्सवात नृत्याचा कार्यक्रम होतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा उत्सव होऊ शकला नव्हता. त्यामुळे या वर्षीच्या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. मोठ्या प्रमाणात लोकं आल्याने गर्दीचं नियंत्रण करण्यात आलं नाही. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात ४४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमी झालेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हॉस्पिटलमध्ये हलवलं जात आहे.

या कार्यक्रमामासाठी दहा हजार नागरिकांना पस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात तीस हजार नागरिकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे या छोट्या जागेत प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाली आणि त्याचं रुपांतर या घटनेत झालं, असं कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितलं. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत दु:ख व्यक्त केलं आहे.

 

First Published on: April 30, 2021 11:11 AM
Exit mobile version