Corona Update: देशात २४ तासांत कोरोनामुळे ४००हून अधिक जणांचा मृत्यू!

Corona Update: देशात २४ तासांत कोरोनामुळे ४००हून अधिक जणांचा मृत्यू!

Corona Update: देशात २४ तासांत कोरोनामुळे ४००हून अधिक जणांचा मृत्यू!

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. एका दिवसात देशात ४०० हून अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडल्याचे समोर येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत कोरोनामुळे ४४५ जणांचा मृत्यू झाला असून १४ हजार ८२१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख २५ हजार २८२वर पोहोचला असून मृतांचा १३ हजार ६९९ झाला आहे. तर सध्या १ लाख ७४ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत २ लाख ३७ हजार १९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील रिकव्हरी रेट हा ५५.७७ टक्के आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३२ हजार ७५वर पोहोचला असून ६ हजार १७० जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचा वेग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ६५ हजार ७४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ९० लाखांहून अधिक झाला आहे. तर मृतांचा आकडा ४ लाख ७० हजारांहून अधिक झाला आहे. तसेच आतापर्यंत ४६ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे.


हेही वाचा – Coronavirus: जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ९० लाख पार!


 

First Published on: June 22, 2020 9:52 AM
Exit mobile version