१३० वर्षीय मगरीच्या अंत्यसंस्काराला ५०० नागरिक एकत्र

१३० वर्षीय मगरीच्या अंत्यसंस्काराला ५०० नागरिक एकत्र

१३० वर्षाच्या मगरीचा अंत्यसंस्कार

छत्तीसगढ येथील बेमेतरा या गावावर आज शोककळा पसरलेली आहे. गावाजवळ असलेल्या तलावातील १३० वर्षीय मगरीवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारात गावातील ५०० नागरिकांनी उपस्थिती लावली. यावेळी गावकरी भावूक झाले असून या मगरीवर अंत्यविधी शास्त्रशुद्ध रितींनी करण्यात आला. या मगरीचे नाव ग्रामस्थांनी गंगाराम ठेवले होते. ही मगर ३ मीटर लांब होती. या मगरीवर फुले आणि अत्तर टाकून तिचे अंत्यसंस्कार ग्रामस्थांनी केले. घरातील एक सदस्याप्रमाणेच या मगरीचे अत्यंसस्कार करण्यात आले. या मगरीने आमच्या मागील पिढीला आणि आम्हाला बघितले म्हणून या मगरीवर योग्य रित्या अंत्यसंस्कार करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

गंगाराम हा आमचा मित्र

मागील अनेक वर्षांपासून गंगाराम गावातील तलावात होता. मात्र त्याने कोणालाही इजा पोहोचवली नाही. ती फक्त मगर नाही तर आमचा मित्रपण होता. गंगाराम भात आणि इतर खाण्याच्या वस्तूही खात होता. तो खूप समंजस होता. तलावत कोणी पोहण्यासाठी गेले असता तो दुसरीकडे जात होता अशी प्रतिक्रिया एका ग्रामस्थानी दिली आहे.

मगरमच्छवाला गाव 

गंगारामची किर्ती सर्व परिसरात होती. गंगाराममुळे गावाला एक वेगळीच ओळख मिळाली. गंगारामच्या समाजस्यामुळे या गावाला मगरमच्छवाला गाव म्हणूनही ओळखल्या जात होते. यासाठी आम्ही गंगारामला कधीही विसरू शकत नाही. गंगारामचे अत्यंसस्कार करून गंगारामचे स्मारक उभारण्याचा आमचा मानस आहे अशी प्रतिक्रीया गावातील रहिवासी विरसिंग दास यांनी दिली.

First Published on: January 10, 2019 9:51 PM
Exit mobile version