पूजा करताना पाय घसरून पुजाऱ्याचा मृत्यू

पूजा करताना पाय घसरून पुजाऱ्याचा मृत्यू

पुजा करताना पाय घसरून पडल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद

तामिळनाडूतील नमक्कल अंजनेर या मंदिरात पूजा करताना पाय घसरून एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ११ फुटाच्या प्लॅटर्फाम वरून कोसळून या पुजाऱ्याचा मृत्यू झाला आहे. येथे उपस्थित असलेल्या एका भाविकाने याचा व्हिडिओ काढला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नमक्कल अंजनेर हे तामिळनाडूयेथील एक मोठे मंदिर आहे. या मंदिरात हनुमानजीची १८ फूट उंच मुर्ती आहे. यामुर्तीची पूजा करते हा प्रकार घडला. पूजा करताना येथे अनेक भाविकही उपस्थित होते. पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यूमध्यो नोंद केली आहे. हे मंदिर प्रसिद्ध असल्याने हे एक पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हा अपघात २६ जानेवारी रोजी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

डोक्याला मार लागल्याने मृत्यू

वेंकटेश असे या पुजाऱ्याचे नाव आहे. हनुमानजीच्या मूर्तीला हार चढवल्यानंतर वेंकटेशचा तोल गेला. वेंकटेश ११ फूटा वरून खाली पडल्यानंतर लोकांनी त्याला उचलले. उपचारासाठी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डोक्याला मार लागल्यामुळे त्याचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या मंदिरात तो उप-पुजारी म्हणून काम करत होता.

 

First Published on: January 30, 2019 1:50 PM
Exit mobile version