केरळमध्ये पावसाचा कहर; ५७ बळी

केरळमध्ये पावसाचा कहर; ५७ बळी

महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. या मुसळधार पावसाने एक लाखाहून अधिकांना सुरक्षित शिबिर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तेथील पावसामुळे पूर आणि भूस्स्खलन दुर्घटनेमध्ये अद्याप ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

अनेकजण सुरक्षितपणे शिबिरात स्थलांतरित

गेल्या दोन दिवसांपासून कोझीकोड आणि मलप्पुरममध्ये २० लोकांचा, तर वायनाडमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ९८८ शिबिरांत १ लाख ६५ हजार ५१९ लोक आहेत. वायनाडमधून सर्वात जास्त २४ हजार ९९० लोकांनी या शिबिरात आश्रय घेतला आहे. अजूनही काही लोक मलप्पुरम आणि वायनाड येथे झालेल्या भूस्खलनामुळे ढिगाऱ्या खाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यूएईचे नागरिकांना आवाहन

केरळमध्ये जाणाऱ्या देशातील नागरिकांना संयुक्त अरब अमिरातने केरळमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत सावधानता बाळगण्यास सांगितले आहे. या मुसळधार पावसाने केरळमधील अनेक भागांत पुरामुळे अनेकांचा बळी गेला आहे.

First Published on: August 11, 2019 8:42 AM
Exit mobile version