करोना व्हायरस: भारतात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

करोना व्हायरस: भारतात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

CORONA VIRUS: कायदा मोडणाऱ्यांना होणार तुरुंगवास

सध्या चीन मधल्या करोना व्हायरस भारतात थैमान घालत आहे. भारतात करोना व्हायरस संदर्भात अजून सहा आढळले आहेत. हे सहा रुग्ण केरळ राज्यात सापडले आहेत. आतापर्यंत देशात करोना व्हायरसचा १०० पेक्षा जास्त लोकांनावर परिणाम झाला आहे. यामुळे लाखो लोकांना फटका बसला आहे. तसंच भारतात करोना व्हायरसचे ५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३४ लोक हे भारतीय असून १६ लोक हे इटालियन आहेत. कर्नाटकात आतापर्यंत चार करोना व्हायरचे रुग्ण असल्याचं आरोग्यमंत्री बी श्रीरामुलु यांनी सांगितलं आहे.

करोना व्हायरसमुळे इराणमध्ये अनेक भारतीय अडकले होते. इराणच्या तेहरानमध्ये अडकलेल्या ५८ जण भारतीय ICE C-17 ग्लोबमास्ट विमानाने भारतात परतले आहेत. या विमानातून २५ पुरुष, ३१ महिला आणि २ मुलं आणण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी सकाळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी माहिती दिली.

याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विट केलं होत की, ५८ जणांचा पहिला भारतीयांचा गट इराण मधून दिल्लीत येणार आहे. भारतीय वायुसेनेचे C-17 विमानाने तेहरानहून उड्डाण केलं आहे आणि लवकरच ते हिंदुन एअरबेसवर दाखल होईल.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी इराण मधील भारतीयांना परत आणण्यास मदत केली. त्यामुळे दूतावासातील अधिकारी आणि भारतीय आरोग्य अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

याच दरम्यान दिल्लीत करोना व्हायरस लागण झालेल्या चौथ्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ७६ लोकांना एकाच घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. दिल्ली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, करोना व्हायरस लागण झालेला व्यक्ती हा परदेशातून आलेला नाही. पेटीएमच्या कर्मचाराच्या संपर्कात आल्यामुळे त्याला करोना व्हायरस लागण झाली आहे. तो पीडित व्यक्ती एका कार्यक्रमाच्या दरम्यान पेटीएम कर्मचाऱ्याच्या संपर्कात आला होता. सध्या या रुग्णाला सफदरजंग हॉस्पिटलमधील स्वतंत्र वार्डमध्ये दाखल केलं आहे.


हेही वाचा – करोनाची अफवा, महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल


 

First Published on: March 10, 2020 6:01 PM
Exit mobile version