गेल्या २ दिवसांत तबलीग जमातीचे ६४७ जण कोरोना पॉझिटिव्ह

गेल्या २ दिवसांत तबलीग जमातीचे ६४७ जण कोरोना पॉझिटिव्ह

दिल्लीच्या निजामुद्दीनमधील मरकजमध्ये आलेल्या तबलीग जमातीतील ६४७ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी लव अग्रवाल म्हणाले की, तबलीग जमातशी संबंधित लोकांना १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमधून शोधण्यात आलं. मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत (गुरुवारी संध्याकाळी ते शुक्रवार संध्याकाळी) भारतात ३३६ नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २,३०१ वर पोहोचला आहे. तर ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जाहीर केलेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी दुपारपर्यंत भारतात एकूण मृत्यूंची संख्या ७२, तर कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजार ५७९ इतकी झाली. याबाबतची माहिती इंडिया टूडेने दिली आहे.


हेही वाचा – Coronavirus: भारतात तरुणांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका


भारतातील ३० लाखाहून अधिक लोकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड केला आहे. ते अॅप कोविड-१९ च्या संबंधित जोखीम, सर्वोत्तम पद्धती आणि संबंधित सल्ल्यांबद्दल माहिती देण्यासाठी डिझाइन केलेले आहे, असं लव अग्रवाल म्हणाले. आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांना कर्तव्य बजावताना डॉक्टरांच्या मार्गात अडथळा निर्माण करु नये असं आवाहन केल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तसंच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

 

First Published on: April 3, 2020 5:50 PM
Exit mobile version