भूकंपच्या झटक्यांनी हादरले फिलीपींस, ७.० रिश्टर तीव्रतेचे धक्के

भूकंपच्या झटक्यांनी हादरले फिलीपींस, ७.० रिश्टर तीव्रतेचे धक्के

फिलीपींसमध्ये भूकंपाचे तीव्र झटके बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ही ७.० रिश्टर स्केलमध्ये होती. गुरुवारी दुपारी १२.२३ वाजता भूकंपाचे मोठे झटके बसले आहेत. या भूकंपाचे केंद्रबिंदू हे फिलीपींसपासून लांब असलेल्या पोंगडूइटान होते. या भूकंपाचे धक्के हदरवणारे होते. भूकंप आल्यावर लोकांनी घरातून पळ काढत सुरक्षित ठिकाणी पलायन केले. ७ ते ७.९ रिश्टर स्केलमधील भूकंपात घरे आणि इमारतींचे मोठा प्रमाणात नुकसान होते. तर जमिनीतील पाईपही फुटून जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. भूकंपाची लक्षणे जाणवताच दुकानातील, तसेच घरातील लोकांनी सुरक्षीत स्थळी धाव घेतली. युरोपीय भूमध्ये भूकंपीय केंद्राने म्हटले आहे की, भूकंप समुद्राता सुमारे १२२ किमी लांबीवर आला होता. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता ही ७.२ रिश्टर स्केल वर्तवण्यात आली होती. तसेच हा भाग भूकंपग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखला जातो.

इंडोनेशियात भूकंपामुळे ९१ लोकांचा मृत्यू

काहिदिवसांपूर्वी इंडोनेशियात आलेल्या भूकंपाने ९१ लोकांचा बळी घेतला आहे. इंडोनेशियात आलेल्या भूकंपाची तीव्रता ही ६.२ रिश्टर होती. गुरुवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने गुरुवारी ही माहिती दिली. १४ जानेवारी रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे कमीतकमी १,१७२ लोक जखमी झाले. एजन्सीच्या प्रवक्त्या रेडिटी जाती यांनी सांगितले की, भूकंपामुळे ९,९१० लोकांना घरे सोडून पळून जावे लागले. १५ जानेवारीपासून १४ दिवस पश्चिम सुलावेसीमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली गेली आहे.

First Published on: January 21, 2021 8:17 PM
Exit mobile version