चकमकीनंतर स्थानिकांचा जवानांवर हल्ला; ७ नागरिक ठार

चकमकीनंतर स्थानिकांचा जवानांवर हल्ला; ७ नागरिक ठार

चकमकीनंतर स्थानिकांनी जवानांवर केला हल्ला

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु होती. या कारवाई दरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांना ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले खरे मात्र या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांचा जमान जवानांच्या दिशेने आला. या जमावाला आवरण्यासाठी जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात ७ नागरिकांचा मृत्यू झाला. चकमकी दरम्यान, एक जवान शहीद तर एक जण जखमी झाला आहे.

स्थानिकांनी जवानांवर केला हल्ला

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पुलवामा जिल्ह्यातल्या सिर्नू गावामध्ये घडली आहे. जवानांनी जम्मू पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या दहशतवादी जहूर अहमद ठोकेरसह तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. जहूर अहमद ठोकेर याच गावचा रहिवासी होता. या माहितीच्या आधारावर जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत ठोकेरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. चकमक अवघ्या २५ मिनिटामध्ये संपली मात्र त्यानंतर जवानांची समस्या वाढली. जेव्हा स्थानिक नागरिकांनी जवानांच्या गाडीवर हल्ला करण्यास सुरुवात केली.

ठोकेरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जवानांनी जमावाला आवरण्यासाठी गोळीबार केला मात्र तरी देखील जमाव जवानांच्या दिशेने येत होता. दरम्यान जवानांना जमावावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारात ७ नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमीमध्ये एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे. ठोकेर मागच्या वर्षी जुलैमध्ये उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील गंटमुल्ला भागातून पोलीस चौकीतून फरार झाला होता. स्वत:ची सर्विस रायफल आणि तीन मॅगझिनसोबत फरार होऊन तो दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. पोलिसांनी सांगितले की, तो पुलवामा जिल्ह्यातील अनेक हत्याकांडामध्ये सहभागी होता. त्याच्यसोबत मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चकमकीत सेनेचा एक जवान शहीद तर दोन जण जखमी झाले. घटनेनंतर दक्षिण काश्मीरमधील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

First Published on: December 15, 2018 7:42 PM
Exit mobile version