Omicron Variant: ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा स्फोट; ७ जणांचा मृत्यू, एका दिवसात ९०, ४१८ बाधितांची नोंद

Omicron Variant: ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा स्फोट; ७ जणांचा मृत्यू, एका दिवसात ९०, ४१८ बाधितांची नोंद

Omicron Variant: ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा स्फोट; ७ जणांचा मृत्यू, एका दिवसात ९०, ४१८ बाधितांची नोंद

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आता भयानक रुप दाखवण्यास सुरुवात केली आहे. सर्वाधिक वेगाने पसरणारा ओमिक्रॉन व्हेरिएंट ८९ देशांमध्ये पसरला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ७वर पोहोचली आहे. तर एका दिवसात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे १० हजार ०५९ रुग्ण आढळले आहेत. यामुळे ब्रिटनमध्ये एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आता २४ हजार ९६८वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ब्रिटनमध्ये ९० हजार ४१८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, १२५ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले की, ओमिक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १वरून आता ७वर गेली आहे. त्यामुळे आता जे आवश्यक आहे, तशी पाऊल उचलणार आहे. आम्ही आकड्यांवर बारकाईने नजर ठेवून आहोत. तसेच वैज्ञानिक आणि सर्वश्रेष्ठ सल्लागारांसोबत याबाबत चर्चा करत आहोत. गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने वाढल्याचे आम्ही पाहत आहोत. त्यामुळे ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी लसीकरण वेगाने केले गेले आहे.

रशियात २४ तासांत १,०२३ जणांचा मृत्यू 

दरम्यान रशियामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा कहर केला आहे. रॉयटर या वृत्तसंस्थेनुसार रशियामध्ये गेल्या २४ तासांत १ हजार ०२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २७ हजार ९६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. रशियातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ कोटी २ लाख १४ हजार ७९वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २ लाख ९७ हजार २०३ जणांना मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Covishield Vaccine : कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांमध्ये आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज


First Published on: December 19, 2021 7:52 PM
Exit mobile version