१० महिने कोरोनो पॉझिटीव्ह असलेल्या आजोबांची कोरोनावर मात

गेल्या दिडवर्षापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचे नवीन नवीन रुप पाहायला मिळत आहे. यामुळे तज्ज्ञमंडळीही चक्रावली आहेत. कोरोनाचा नाश करण्यासाठी सगळेच देश संशोधन करत आहेत. याचदरम्यान, ब्रिटनमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडल्याचे समोर आले आहे. ‘डेव्ह स्मिथ’ नामक ७२ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह आजोबांचा
रिपोर्ट तब्बल १० महिन्यांनी निगेटीव्ह आला आहे. कोरोना विषाणूचा हा दुर्मिळ प्रकार असल्याचं तज्त्रांच म्हणणं असून दहा महिने कोरोनाशी लढणाऱ्या आजोबांनी शॅप्मेन फोडून कोरोनामुक्त झाल्याचा आनंद साजरा केला आहे. जगातील हे एकमेव उदाहरण असल्याने जगभरातून आजोबांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

डेव्ह स्मिथ पश्चिम इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे आपल्या कुटुंबासह राहतात. ते सेवानिवृत्त ड्रायव्हिंग इन्ट्रक्टर आहेत. दहा महिन्यापूर्वी मार्च २०२० मध्ये त्यांना व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली. स्मिथ यांना ल्युकेमेनिया असून फुफ्फुसाशी संबंधित गंभीर आजारही आहेत. त्यांची तब्येत पाहता डॉक्टरांनी त्यांना होम क्वारनटाईन होण्याचा सल्ला दिला त्यामुळे ते घरीच उपचार घेत होते. पण यादरम्यान त्यांच्या ४३ वेळा तपासण्या करण्यात आल्या आणि प्रत्येकवेळी त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्हच येत होता. सातवेळा श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले. यामुळे स्मिथ यांनी आपण आता जगणार नसल्याचे सांगत अंत्यसंस्काराची तयारी करण्याचे पत्नीला सांगितले. पण दहाव्या महिन्यानंतर मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आणि स्मिथ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी शॅम्पेन फोडून एकच जल्लोष केला.

स्मिथ यांच्या शरीरात कोरोना व्हायरस इतके दिवस कुठे लपून बसला असावा असा प्रश्न डॉक्टरांना पडला असून कोरोना व्हायरसचा हा दुर्मिळ प्रकार असल्याचे तज्त्रांच म्हणणं आहे.

 

First Published on: June 24, 2021 7:56 PM
Exit mobile version