आठ वर्षात ७५० वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात सर्वाधिक वाघांचा मृत्यू

आठ वर्षात ७५० वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात सर्वाधिक वाघांचा मृत्यू

भारतात, गेल्या आठ वर्षात शिकारी व इतर कारणांमुळे ७५० वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक १७३ वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. त्यात म्हटले की, यातील ३६९ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला तर १६८ वाघांना शिकार्यांनी ठार केले आहे. ७० वाघांच्या मृत्यू अद्याप तपास सुरू आहे. तर ४२ वाघांचा अपघात आणि संघर्षाच्या घटनांसारख्या अनैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.

तसेच, २०१२ ते २०१९ या आठ वर्षांच्या कालावधीत देशभरात १०१ वाघाचे अवशेषही सापडले असल्याची माहिती एनटीसीएने दिली आहे. २०१० ते मे २०२० या कालावधीत वाघाच्या मृत्यूची माहिती सांगण्याचे आवाहन केले होते. दरम्यान त्यामध्ये केवळ २०१२ ते आठ वर्षांच्या कालावधीचा तपशील देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात मागील चार वर्षांत वाघांच्या संख्येत ७५० ने वाढ झाली असून एकूण वाघांची संख्या २ हजार २२६ वरून २ हजार ९७६ वर पोहोचली आहे.

मध्य प्रदेशात सर्वाधिक १७३ वाघांचा मृत्यू

एनटीसीएने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षांत मध्य प्रदेशात सर्वाधिक १७३ वाघांचा मृत्यू झाला. यापैकी ३८ वाघांचा शिकार झाल्याने मृत्यू झाला, तर ९४ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असून १९ वाघांच्या मृत्यूचा तपास अद्याप सुरू आहे. अनैसर्गिक कारणांमुळे ६ वाघांचा मृत्यू झाला तर १६ वाघांचे अवशेषही सापडले आहेत.

वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र गेल्या ८ वर्षांत दुसऱ्या स्थानी

देशातील मध्य प्रदेशात सर्वाधिक ५२६ वाघ आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाघांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र गेल्या आठ वर्षांत दुसऱ्या स्थानावर होते. त्यात १२५ वाघांचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्नाटकात १११, उत्तराखंडमध्ये ८८, तामिळनाडूमध्ये ५४, आसाममध्ये ५४, केरळमध्ये ३५, उत्तर प्रदेशात ३५, राजस्थानात १७, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये ११ आणि छत्तीसगडमध्ये १० वाघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एनडीसीएने असे सांगितले की ओडिशा आणि आंध्र प्रदेशात ७ वाघांचा मृत्यू झाला, तेलंगणामध्ये प्रत्येकी ५,दिल्ली आणि नागालँडमध्ये प्रत्येकी एक, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एका वाघांचा मृत्यू झाला आहे.


मुंबई पोलिसांनी वेळीच केलं रक्तदान, त्यामुळे पार पडली ‘शस्त्रक्रिया’!
First Published on: June 4, 2020 9:30 PM
Exit mobile version