ब्रिटनची चिंता वाढली! २४ तासात ७,५४० कोरोनाबाधितांची नोंद

ब्रिटनची चिंता वाढली! २४ तासात ७,५४० कोरोनाबाधितांची नोंद

ब्रिटनची चिंता वाढली! २४ तासात ७,५४० कोरोनाबाधितांची नोंद

जगात कोरोना महामारीत सर्वाधिक होरपळून गेलेला देश म्हणून ब्रिटनकडे बोट दाखवले जाते. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र गेल्या काही महिन्यात ब्रिटनमधील मृत्यूंची संख्या फार कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र ब्रिटनच्या चिंतेत आणखी भर पडणार असल्याचे चित्र पुन्हा उभे राहिले आहे. कारण ब्रिटनमध्ये बुधवारी केवळ २४ तासात तब्बल ७ हजार ५४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (7,540 new corona patients recorded in wednesday at UK in 24 hours)  केवळ एका दिवसात इतक्या रुग्णांची नोंद झाल्याने ब्रिटनमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे. जवळपास १०३ दिवसांनी ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत विक्रमी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

कोरोना डेल्टा वेरिएंटमुळे ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे ब्रिटिश शास्रज्ञ प्रा. नील फर्ग्युसन यांनी म्हटले आहे. पुढील दोन ते तीन आठवडे ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तर ब्रिटनमधील काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, ब्रिटनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी त्याचा तसा फारसा धोका नाही. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४५ लाख ३० हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ हजार २३४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

ब्रिटनमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये गेल्या एक आठवड्यापासून ५ हजार ५०० हून अधिक बाधित रुग्ण आढळत आहेत. जगभरात ब्रिटन या देशाला कोरोना महामारीचा सर्वात जास्त फटका बसला आहे. ब्रिटनंतर अमेरिका आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. या तीन देशांना कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पहायला मिळत आहे.


हेही वाचा – covishield vs covaxin :कोवॅक्सिनपेक्षा कोव्हिशील्ड अधिक प्रभावी; या संशोधनावर भारत बायोटेकने व्यक्त केला संताप

First Published on: June 10, 2021 9:18 PM
Exit mobile version