मलेशियाला पळून जाणाऱ्या ‘त्या’ आठ संशयितांना दिल्ली विमानतळावर अडवले

मलेशियाला पळून जाणाऱ्या ‘त्या’ आठ संशयितांना दिल्ली विमानतळावर अडवले

दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज साधारण ८ संशयितांना इमिग्रेशन विभागातील अधिकाऱ्यांनी अडवले. हे संशयित विशेष फ्लाईटने मलेशियाला जाण्याच्या तयारीत होते. हे सर्व जण दिल्लीतील विविध भागात राहत असून यांनी निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे समजते. ज्या आठ जणांना अडवण्यात आले ते सर्व मलेशियातील नागरिक असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वांना दिल्ली पोलीस आणि आरोग्य विभागाच्या ताब्यात दिले जाऊ शकतो. रिलीफ फ्लाइटच्यावतीने मेलिंडो एअरवेजची एक फ्लाइट दिल्लीहून मलेशियाला जाणार होती. याच विमानातून हे सर्व संशयित मलेशियाला जाणार होते. दिल्लीत तबलीग जमातच्या मरकज कार्यक्रमातील ५०० जण सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर १ हजार ८०० लोकं क्वारंटाइन आहेत. विमानतळावरून ताब्यात घेतलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाईल, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा – Coronavirus : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२२१ गुन्ह्यांची नोंद; २ कोटी ८२ लाखाचा मुद्देमाल जप्त

दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरामध्ये तबलीग जमातच्या मरकज कार्यक्रमामुळे मोठा गहजब उडाला आहे. मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आलेले लोक कोरोनाग्रस्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याबाबत देण्यात आलेली आकडेवारी गंभीर अशी आहे. देशभरात आत्तापर्यंत एकूण २ हजार ९०२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यातल्या ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याशिवाय १८३ जण बरे होऊन घरीदेखील परतले आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी ३० टक्के म्हणजे तब्बल १ हजार ०२३ जण हे तबलीग जमातशी संबधीत असल्याची माहिती आज केंद्रीय सचिवांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

First Published on: April 5, 2020 4:14 PM
Exit mobile version