TRS celebertion: केक कापून जल्लोष साजरा

TRS celebertion: केक कापून जल्लोष साजरा

सौजन्य-सोशल मीडिया

देशातील 

टीआरएस‘ला मिळालेल्या विजयावरुन, तेलुगू जनतेने पुन्हा एकदा केसीआर यांना मुख्यमंत्रीच्या रुपात कौल दिला असल्याचं म्हणता येईल. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा टीआरएसने मोठा विजय मिळवला आहे. वारंगल, मेदक आणि करीमनगर या जिल्ह्यात टीआरएस प्रामुख्याने आघाडीवर आहे. तेलंगणात टीआरएस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. तेलंगणात टीआरएस सध्या ८७ जागांवर आघाडीवर असून, टीडीपी-काँग्रेस युती २१, भाजपा १ तर इतर १० जागांवर आहेत. त्यामुळे तेलंगणात पुन्हा एकदा टीआरएस-एमआयएम सत्तेवर बसणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. दुसरीकडे हैदराबादमधून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी झाले आहेत. दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी यांचा हा सगल पाचवा विजय आहे. ‘चंद्रयानगुट्टा’ या त्यांच्या मतदारसंघातून ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. अकबरुद्दिन ओवेसी यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेद्वारावर बहुमताने मात केलं असून, त्यांच्या झोळीत एकूण ७३ हजार ९९२ मतांचं दान पडलं आहे.

First Published on: December 11, 2018 7:13 PM
Exit mobile version