‘या’ इडली विक्रेत्या आजीबाई देतात गरिबांना मोफत नाश्ता

‘या’ इडली विक्रेत्या आजीबाई देतात गरिबांना मोफत नाश्ता

तामिळनाडू

काही दिवसांपूर्वी अवघ्या एक रुपयात इडली विक्री करणाऱ्या ८२ वर्षाच्या कमलथल आजीबाबत आपण वाचल असेल. आता आणखी एक मोफत इडली विक्री करणारी आजीबाई समोर आली आहे. तामिळनाडूमधील ७० वर्षाच्या आजीबाई राणी या इडली विकण्याचा उद्योग करतात. तामिळनाडूमधील रामेश्वरमच्या अग्नी तिर्थमजवळ त्यांचे इडलीचे दुकान आहे. सर्वसामान्यांसाठी ३० रुपये प्लेट इडली देणाऱ्या या आजीबाई गरिबांना मात्र मोफत इडली देतात. विशेष म्हणजे त्या अजूनही पारंपारिक पद्धतीने लाकडाच्या पात्रात इडली बनवतात.

आजी सांगतात की, गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांचा हा इडली विकण्याचा उद्योग सुरू आहेत. त्यांनीदेखील त्यांच्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत इडली बनवून विकण्याचा वारसा पुढे सुरू ठेवला. माझ्याकडे मोठ दुकान थाटण्याइतपत मोठी जागा नाही. केवळ चारपायी (छोट्याशा जागेत) मी इडली बनवण्याचे काम करते. जे सर्वसामान्य हॉटेलमध्ये जाऊन ८० रुपये प्लेटवाली इडली खाऊ शकत नाही त्यांच्यासाठी मी ३० रुपयांत इडली प्लेट ठेवली आहे.

First Published on: September 15, 2019 1:09 PM
Exit mobile version