कोरोनाविरोधात येतेयं आता ‘सुपरवॅक्सीन’, ना होणार व्हेरियंटचा त्रास, नाही महामारीचा धोका!

कोरोनाविरोधात येतेयं आता ‘सुपरवॅक्सीन’, ना होणार व्हेरियंटचा त्रास, नाही महामारीचा धोका!

door to door vaccination : केंद्राचा मोठा निर्णय, देशात नोव्हेंबरपासून घरोघरी जाऊन होणार लसीकरण

कोरोना महामारीचा सामान करत असतानाच जगभरात पसरणाऱ्या कोरोनाचे नवनव्या व्हेरियंटने चिंतेत आणखी भर पडली आहे. अनेक देशांमधील कोरोनाचे नवे व्हेरियंट समोर येत आहेत. यामुळे जगासमोरील कोरोना संकट काही थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र आहे. यावर आत जगभरातील शास्त्रज्ञांकडून अशी लस बनवण्यावर काम सुरु आहे जी कोरोनाच्या सर्वच व्हेरियंटवर अगदी प्रभावी ठरेल. कोरोनाविरोधात येणारी ‘सुपरवॅक्सीन’  भविष्यात उद्धवणाऱ्या कोरोना महामारीला रोखण्यासाठी मदत करेल.  पीटीआयच्या वृत्तानुसार, कोरोना विषाणुवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी अशी एक लस तयार केली आहे. जी कोरोनाशिवाय ती कोरोना विषाणूच्या इतर व्हेरियंटविरोधातही प्रभावी ठरत आहे. नुकतेच या लसीचे उंदरांवर परीक्षण करण्यात आले.

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना युनिर्व्हसिटीच्या शास्त्रज्ञांनी या लसीवर आधीच संशोधन सुरू केले आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोणत्या विषाणूमुळे पुढील महामारी उद्भवू शकते हे कोणालाही माहित नाही. त्यामुळे आतापासूनच सर्व प्रकारच्या तयारी करणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या प्रत्येक व्हेरियंटवर ठरणार प्रभावी

कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटमुळे भविष्यात येणाऱ्या महामारीला रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी एक लस तयार केली आहे, जी कोरोनाच्या विषाणु आणि त्याच्या इतर सर्व व्हेरियंटवर अत्यंत प्रभावी ठरत आहे. ज्यामुळे, प्राण्यांपासून मनुष्यात कोरोना विषाणु पसरण्याचा धोका कमी होणार आहे.

शास्त्रज्ञांच्या संशोधनात ही लस दुसर्‍या पिढीतील लस असल्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. जी sarbecoviruses वर हल्ला करते. sarbecoviruses हा कोरोना व्हायरस फॅमिलीमधील एक भाग आहे. या कोरोनाच्या याच दोन व्हेरियंटने जगभरात गेल्या दोन दशकांपासून धुमाकूळ घातला आहे. यातील पहिला व्हेरियंट म्हणजे SARS आणि दुसरा कोविड-१९.

या लसीवर संशोधन करणाऱ्या शास्त्राज्ञांच्या टीमने mRNA पद्धत अवलंबली आहे. हीच पद्धत फायझर आणि मॉर्डना लस विकसिकरणासाठी वापरण्यात आली होती. त्यामुळे ही युनिर्व्हसल वॅक्सिन किंवा सुपर वॅक्सीन कोरोनाच्या प्रत्येक व्हेरियंटचा पराभव करण्यास सक्षम असणार आहे.

या लसींच्या मानवी चाचण्या केव्हा होणार सुरु?

या लसीचे ट्रायल जेव्हा उंदरांवर करण्यात आला तेव्हा या लसीमुळे असे काही अँटीबॉडी तयार झाले  जे अनेक स्पाइक प्रोटीनचाही सामना करु शकतात. यात दक्षिण अफ्रिकेत आढळलेला B.1.351 या व्हेरियंटचाही समावेश आहे. या लसीमध्ये कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटला रोखण्याची क्षमता असल्याचे अभ्यासात सांगण्यात आले आहे.
या ट्रायलमध्ये वापरण्यात आलेले उंदीर SARS-CoV आणि कोरोनाच्या अन्य व्हेरियंटने संक्रमित होते. अद्याप यामध्ये टेस्टिंग सुरु असू सर्वकाही ठीक झाले तर पुढच्या वर्षी या लसीचे मानवी चाचण्या सुरु केले जाऊ शकते.
शास्त्रांज्ञांचे म्हणणे आहे की, लसीवर अद्याप आमची योजना काम करत आहे, जर ही योजना पुढील काही काळात योग्यरित्या सुरु राहिल्यास आम्ही युनिवर्सल वॅक्सिन तयार करु शकतो. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मदत होऊ शकते.


विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीला ईडीचा दणका, ९ हजार कोटींची संपत्ती घेतली ताब्यात


 

First Published on: June 23, 2021 3:48 PM
Exit mobile version