पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण; ७२ जण क्वारंटाईन

पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण; ७२ जण क्वारंटाईन

दिल्लीत पिझ्झा डिलिव्हरीचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्याच्या संपर्कात आलेल्या ७२ जणांना क्वारंटाईन केलं आहे. पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा हाऊज खास आणि मालवीय नगरमधील ७२ जणांना महाग पडला आहे. हाऊज खास आणि मालवीय नगरमधील ७२ जणांना घरात क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दक्षिण दिल्ली जिल्ह्याचे जिल्हान्याय दंडाधिकारी बी. एम. मिश्रा यांनी सांगितलं की, ७२ जण डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आले होते. या सर्व लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.


हेहा वाचा – थायलंडमध्ये कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहातून पसरला कोरोनाचा विषाणू


डिलिव्हरी बॉय मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ड्युटीवर होता आणि गेल्या आठवड्यातच त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मागील आठवड्यात डायलिसीस करण्यासाठी हा कर्मचारी रुग्णालयात गेला होता. त्यावेळी तो कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. पिझ्झा डिलिव्हरी करणारा व्यक्ती ७२ लोकांव्यतिरिक्त अन्य कोणाशी संपर्कात आला की नाही याचा शोध प्रशासन घेत आहे. दरम्यान, मालवीय नगरमधील काही भाग सील करण्यात आला आहे.

 

First Published on: April 16, 2020 1:06 PM
Exit mobile version