नागालँडच्या पर्वतांमध्ये आढळला दुर्मीळ जंगली प्राणी, जो आधी कधीच तिथे दिसला नाही

नागालँडच्या पर्वतांमध्ये आढळला दुर्मीळ जंगली प्राणी, जो आधी कधीच तिथे दिसला नाही

नागालँडच्या पर्वतांमध्ये आढळला दुर्मीळ जंगली प्राणी, जो आधी कधीच तिथे दिसला नाही

हल्ली इंस्टाग्राम,टिव्ही आणि वाघ,चित्ता अशा वेगवेगळ्या प्राण्याची व्हिडीओ आपण पाहत असतो. अनेकवेळा आपण प्राण्यांच्या व्हिडीओ पाहत असतो. मात्र या प्राण्यांना प्रत्यक्षरित्या पाहण्याचा वेगळाच आनंद आहे. नागालँडच्या पर्वतांमध्ये एक दुर्मीळ प्राणी सापडला आहे. जो प्राणी याआधी कधीच तिथे दिसला नाही. जो प्राणी सहसा नागालॅंडच्या टेकड्यांमध्ये पाहायला मिळत नाही. खरतर,क्लाउडेड लेपर्ड म्हणजेच ढगाळ बिबट्या या नागालँडच्या टेकड्यांमध्ये पाहायला मिळते. बिग कॅट्स कुटूंबातील ही जात फार दुर्मीळ आहे. नागालॅंडच्या टेकड्यांमध्ये हा ‘मायावी’ बिबट्या पहिल्यांदाच दिसला आहे.

संशोधकांच्या पथकाने नागालँडमधील भारत-म्यानमार सीमेवरील जंगलात 3,700 मीटर उंचीवर क्लाउडेड बिबट्या लपल्याचा फोटोग्राफिक पुरावे गोळा केले आहेत. क्लाउडेड बिबट्या (निओफेलिस नेब्युलोसा), झाडावर चढण्यात मास्टर असतो ही एक मध्यम आकाराची जंगली मांजर आहे. परंतु मोठ्या मांजरींपैकी सर्वात लहान मानली जाते. दिल्लीतील नॉन-प्रॉफिट वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया (WPSI) च्या नेतृत्वाखालील संशोधकांनी पूर्व नागालँडमधील किफिरे जिल्ह्यातील थानामीर गावातील सामुदायिक जंगलात 3,700 मीटर बाय 50 सेमी उंचीवरुन त्याचे फोटो काढले आहेत.

असा असतो ‘ढगाळ बिबट्या’

ढगाळ बिबट्यावर  ठिपक्यांऐवजी त्याच्या अंगावर मोठे मोठे ब्लॉक असतात म्हणूनच याचे नाव ढगाळ बिबट्या असे पडले आहे.ढगाळ बिबट्या हा सदृश असतो.हा आकाराने खूपच लहान असतो आणि वजन जेमतेम 20-22 किलोपर्यंत भरते.  मांजरकुळामध्ये सर्वात जाड शेपटी याची असते. हा मुख्यत्वे झाडावर राहणे पसंत करतो व क्वचितच जमिनीवर उतरतो. त्याच्या जाड शेपटीमुळे त्याला झाडावर तोल सांभाळणे सोपे जाते.


हेही वाचा – Corona Virus : गृहमंत्री वळसे पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, २१ कर्मचारी पॉझिटिव्ह


 

 

First Published on: January 7, 2022 4:07 PM
Exit mobile version