महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे महात्मा गांधींची एक खास भेट… नरेंद्र मोदींनी सांगितला किस्सा

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे महात्मा गांधींची एक खास भेट… नरेंद्र मोदींनी सांगितला किस्सा

ब्रिटिश राजघराण्याच्या मानाच्या गादीवर गेली सात दशके विराजमान असलेल्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वृद्धपकाळाने निधन झालं आहे. त्या 96 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आता याबाबत शोक व्यक्त करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इंस्टाग्रम अकऊंटवर देखील पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल शोक
नरेंद्र मोदी यांनी राणी सोबतच्या मुलाखती दरम्यानचे फोटो शेअर करत लिहिलं की, “2015 आणि 2018 मध्ये यूकेच्या यात्रेदरम्यान माझी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासोबत भेट झाली. मी त्यांच्या उत्साहाला आणि दयाळू स्वभावाला कधीही विसरू शकत नाही. एका बैठकीदरम्यान त्यांनी मला एक रुमाल दाखवला जो महात्मा गांधींनी त्यांना त्यांच्या लग्नात भेट म्हणून दिला होता.”

तसेच नरेंद्र मोदींनी पुढे लिहिलं की, “महाराणी एलिझाबेथ द्वितीय या आमच्या काळातील दिग्गज म्हणून नेहमीच स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले. सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली. त्यांच्या निधनाने मी दुखावलो आहे.”

त्याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिलं की, “त्यांनी 7 दशकांहून अधिक काळ आपला देश चालवून एक युग उलटून गेले आहे. मी ब्रिटनच्या लोकांच्या दु:खात सहभागी आहे आणि कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते.”

First Published on: September 9, 2022 10:13 AM
Exit mobile version