अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखालून 3 जणांची सुखरूप सुटका

अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखालून 3 जणांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : अहमदाबादच्या वेजलपूर भागात 50 वर्ष जुनी इमारत कोसळल्याची (50-year-old building collapsed) घटना घडली आहे. या दुर्घटनेतून  23 जणांना सुखरूप बाहेर काढले होते, तर उर्वरीत 3 जणांना पोलीस आणि अग्निशमन दलाने बचाव मोहीम राबवून ढिगाऱ्याखालून ३ जणांची सुटका केली आहे. (three-storey building collapsed in Ahmedabad)

अहमदाबादच्या वेजलपूर भागातील सोनल सिनेमाजवळ 50 वर्ष 3 मजली इमारत कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, इमारत आधीच जीर्ण घोषित करण्यात आल्यामुळे बहुतेक लोकांनी आपली घरे रिकामी केली होती, परंतु अजूनही काही कुटुंबे या जीर्ण इमारतीमध्ये राहत होती. त्यामुळे इमारत कोसळल्याचे वृत्त समोर येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले.

अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितले की, गोल्डन फ्लॅट नावाची इमारत कोसळल्याचा फोन अग्निशमन विभागाला आला. त्यामुळे दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. आम्ही या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच इमारतीतून 23 जणांची सुटका करण्यात आली होती आणि अडकलेल्या इतर 3 जणांना पोलीसांची मदत घेत आम्ही सुखरूप बाहेर काढले.

मागील वर्षी लिफ्ट कोसळल्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला होता
सप्टेंबर २०२२ मध्ये गुजरात विद्यापीठाजवळ नव्याने इमारतीचे बांधकाम सुरू होते. इमारतीच्या नवव्या मजल्यावर काम सुरू असल्यामुळे मजूर लिफ्टमधून सामान घेऊन जात होते. त्याचदरम्यान सातव्या मजल्यावर पोहोचल्यावर लिफ्ट तुटली. या लिफ्टमध्ये 8 मजूर अडकून पडले होते. परंतु इमारतीची लिफ्ट कोसळली आणि त्यात जणांचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता.

 

First Published on: May 12, 2023 8:11 AM
Exit mobile version