‘आपने गुजरातमध्येही खेळ खराब केला आणि…’ पराभवानंतर पी. चिदंबरम यांचा केजरीवालांवर ठपका

‘आपने गुजरातमध्येही खेळ खराब केला आणि…’ पराभवानंतर पी. चिदंबरम यांचा केजरीवालांवर ठपका

उत्तराखंड आणि गोव्याप्रमाणेच गुजरातमध्येही आम आदमी पार्टीने खेळ खराब केला, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केले. गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. गुजरातमध्ये भाजपाने तर हिमाचलमध्ये काँग्रेसने बाजी मारली. तसेच त्यापूर्वी झालेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत (एमसीडी) आपने विजय मिळवला. मात्र, गुजरातमधील काँग्रेसच्या पराभवाचा ठपका पी. चिदंबरम यांनी ‘आप’वर ठेवला आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यावर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (AAP spoils the game p Chidambaram reacts to Congress poor performance in Gujarat Assembly Election 2022 arvind kejriwal)

एका वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी गुजरातमधील काँग्रेसच्या पराभवाचा ‘आप’वर ठपका ठेवला. यावेळी ते म्हणाले की, “उत्तराखंड आणि गोव्याप्रमाणेच गुजरातमध्येही ‘आप’ने खेळ खराब केला, तर दिल्लीबाहेर इतर ठिकाणी त्याची लोकप्रियता कमी होते. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘पोल’ बनण्यासाठी काँग्रेसची स्थिती सर्वोत्तम आहे. ज्याभोवती बिगर-भाजप आघाडी तयार केली जाऊ शकते. गुजरातच्या पराभवातून काँग्रेसने काहीतरी शिकले पाहिजे. मोठ्या निवडणुकांमध्ये गुप्त मोहिमेसारखी कोणतीही गोष्ट नसते”

“तीनही ठिकाणी भाजपची सत्ता होती, पण दोन ठिकाणी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंतन करायला हवे. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. गुजरातमधील विजय महत्त्वाचा आहे, परंतु सत्ताधारी भाजपला हिमाचल प्रदेश आणि एमसीडीमध्ये निर्णायक पराभव पत्करावा लागला हे वास्तव लपवता येणार नाही”, असेही पी. चिदंबरम यांनी यावेळी म्हटले.

गुजरातमध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली. तर दुसरीकडे हिमाचलमध्ये भाजपकडून सत्ता आपल्याकडे खेचण्यात काँग्रेसला यश आले. भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीत यंदा ऐतिहासित विजय मिळवला आहे. भाजपने आपल्या होमपिचवर सलग सातव्यांदा विजय मिळवला. या विजयासह भाजपने गुजरातमध्ये दणदणीत सर्व विक्रम मोडीत काढले. गुजरातमध्ये भाजपने 155 हून अधिक जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय मिळताना दिसत आहे.


हेही वाचा – जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचा विजय; एकनाथ खडसेंना मोठा धक्का

First Published on: December 11, 2022 6:25 PM
Exit mobile version