बॉलीवूड कलाकारांच्या फेअरनेस क्रिम जाहिरातींवर अभय देओलने साधला निशाणा

बॉलीवूड कलाकारांच्या फेअरनेस क्रिम जाहिरातींवर अभय देओलने साधला निशाणा

अमेरिकेत कृष्णवर्णिय जॉर्ज फ्लॉयड यांच्या निधनाच्या बातमीने जगभरातून हळहळ व्यक्त होत असताना आता बॉलीवूड कलाकारांनीही या प्रकणात उडी घेतली आहे. अभिनेता अभय देओल यांनी फेअरनेस क्रिमची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला असून एका संशोधन अहवालातून काही मुद्देदेखील उपस्थित केले आहेत. दरम्यान, #blacklivesmatter चे समर्थन करत असल्यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोलदेखील होत आहेत. यापूर्वी अभिनेत्री कंगना रनौतनेही फेअरनेस क्रिम जाहिरातींचा मुद्दा उपस्थित केला होता. तिने या जाहिरातींना विरोध दर्शवत काळ्या व गोऱ्या रंगात भेदभाव कशाला करायचा, असे म्हणत आपण यासंबंधीच्या जाहिरातींचे ऑफर्स नाकारल्याचे तिने म्हटले होते.

अभयने शेअर केला संबंधीत आलेख 

अभय देओल याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंबंधीचे पोस्ट शेअर केले असून एक प्रश्न त्यांनी वाचकांना विचारला आहे. तुम्हाला वाटते का की भारतीय कलाकार फेअरसेन क्रिमचा प्रचार करणे थांबवतील, असे त्याने पोस्टमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, त्यांनी ग्राफिक्सच्या माध्यमातून वापरण्यात येणाऱ्या फेअरनेस क्रिमच्या मागणीचे आलेखदेखील दाखवले आहेत. भारतात काही वर्षांपूर्वी फेअरनेस क्रिम आली. आधी फेअरनेस क्रिम आणि आता स्किन लाईटनिंग, व्हाईटनिंगसोबत ब्राईटनिंग क्रिमदेखील बाजारात आली. कित्येक ब्रँड्स हे फेअरनेस क्रिमच्या प्रकारात येऊ इच्छित नसल्याने त्यांना आता एचडी ग्लो, व्हाईट ब्युटी, व्हाईट ग्लो आणि फाईन फेअरनेस असे त्यांच्या प्रसाधनांना नावे दिली आहेत. बदलत्या काळानुसार आता या कंपन्यांनी पुरुषांसाठीही असे फेअरनेस क्रिम बाजारात आणले आहेत, हे मुद्दे अभय देओल याने मांडले आहेत.

दरम्यान, अभयने त्याच्या पोस्टमध्ये काही ठराविक ब्रँडची नावं नमूद केली असून त्यांना विकणाऱ्या वेबसाइटचीही माहिती दिली आहे. तसेच याची जाहिरात करणाऱ्या बॉलीवूड कलाकारांचाही समावेश या पोस्टमध्ये केला आहे. यात कुबरा सैत, मासाबा गुप्ता हे आहेत. यावर अभिनेत्री कुबरा सैत हिने अभयला उत्तर देताना यापुढे आपण फेअरनेस क्रिमची जाहिरात करणार नसल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा –

भयंकर, हत्तीणीनंतर गर्भवती गायीला खाऊ घातले फटाके

First Published on: June 6, 2020 5:36 PM
Exit mobile version