‘आप’ आमदार अमानतुल्ला खान यांच्या 4 ठिकाणांवर एसीबीची छापेमारी, एक शस्त्रही सापडले

‘आप’ आमदार अमानतुल्ला खान यांच्या 4 ठिकाणांवर एसीबीची छापेमारी, एक शस्त्रही सापडले

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या 4 ठिकाणांवर दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने छापे टाकले आहेत. या छापेमारीत एसीबीला एका ठिकाणी 1 शस्त्रही सापडल्याची माहिती मिळते. शुक्रवारी अमानतुल्लाला यांना एसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. (acb raids on aap leader and mla amanatullah location)

मिळालेल्या माहितीनुसार, अमानतुल्ला यांच्या बिझनेस पार्टनरवरही छापे टाकण्यात आले आहेत. या छापेमारीत एसीबीला 12 लाखांची रोकडही मिळाली आहे. शिवाय, अमानतुल्ला खान सापडलेल्या शस्त्राचा परवाना दाखवता आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खान हे दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नोटीसबद्दल ट्विट केले आणि दावा केला की त्यांना वक्फ बोर्डाचे नवीन कार्यालय मिळाले आहे, म्हणून त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (ACB) गुरुवारी आम आदमी पक्षाचे नेते अमानतुल्ला खान यांना वक्फ बोर्डाशी संबंधित दोन वर्षे जुन्या प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात शुक्रवारी दुपारी १२ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.


हेही वाचा – शैक्षणिक संस्थांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

First Published on: September 16, 2022 7:30 PM
Exit mobile version