सोनू सूद आज अरविंद केजरीवाल यांची घेणार भेट, भेटीमागे पंजाब निवडणुकीचे कनेक्शन?

सोनू सूद आज अरविंद केजरीवाल यांची घेणार भेट, भेटीमागे पंजाब निवडणुकीचे कनेक्शन?

सोनू सूद आज अरविंद केजरीवाल यांची घेणार भेट, भेटीमागे पंजाब निवडणुकीचे कनेक्शन?

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आणि गरीबांचा ‘मसीहा’ सोनू सूद आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहे. मात्र या भेटीमागे अनेक राजकीय तर्क लढवले जात आहे. आगामी पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनू सूद केजरीवाल यांना भेटणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे. सोनू सूद आज नवी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहे. या भेटदरम्यान नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होईल याविषयी अभिनेता सोनू सूद किंवा आम आदमी पक्षाकडून काहीही सांगण्यात आले नाही.

पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात पंजाब राज्यातही या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी स्वतःचा ताकदवान उमेदवार शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी माजी मंत्री आणि अकाली दलचे (संयुक्त) नेते सेवा सिंह सेखवान यांची भेट घेत त्यांना पक्षात सामील करून घेतले. मात्र आम आदमी पार्टी अजूनही पंजाबमध्ये मोठ्या चेहऱ्याच्या शोधत आहे. राजकीय जानकारांचा विश्वास आहे की, अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे सोनू सूदच्या रूपाने पंजाब निवडणुकासाठी ‘आप’चा उमेदवार निवडीचा शोध संपू शकतो.

कोरोना महामारीत सोनू सूदचे महान कार्य

सोनू सूदची ओळख केवळ अभिनेता म्हणून केली जात नाही, तर कोरोना महामारीच्या काळात सोनू सूदने स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सुमारे दीड लाख लोकांना त्यांच्या घरी सुखरुप पोहचवण्यात सोनू सूदने खूप मोठी मदत केली होती. तसेच सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्याने अनेकांना मदत केली. याशिवाय अडचणीत असलेल्या सर्व सामान्य लोकांच्या तो संपर्कात होता. एकूणच गरीबांना मदत केल्यामुळे त्या गरीबांचा ‘मसीहा’ म्हणून देखील ओळखला जाऊ लागला. एकूण या मोठ्या सामाजिक कार्यांमुळे सोनू सूद एक मोठ्या दिलाचा माणूस म्हणून प्रकाशझोतात आला.

सोनू सूद पंजाबचा रहिवासी

सोनू सूद स्वतः पंजाबमधील मोगाचा रहिवासी आहे. साहजिकच,आम आदमी पक्ष जर यावेळी सोनू सूदला त्यांच्यासोबत आणण्यात यशस्वी झाला, तर त्यांच्या नावाने बंड करण्याची किंवा विरोधी पक्षाकडून प्रश्न उपस्थित करण्याची शक्यताही कमी असेल. परंतु सोनु सूद आम आदमी पक्षात सामील झाला तरचं पंजाब निवडणुकीच्या रिंगणात तो एक मोठा चेहरा म्हणून निश्चितच होईल. याशिवाय आम आदमी पार्टी त्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देखील घोषित करू शकते अशीही चर्चा आहे.

असेही म्हटले जात आहे की, आम आदमी पार्टी आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आंदोलक शेतकरी नेत्यांमधून एका शीख मुख्यमंत्र्याचा चेहरा शोधत आहे. शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांच्यासोबत आम आदमी पक्षाच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सध्या फक्त सोनू सूद आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीबाबत अनेक तर्क लढवले जात आहेत.


जयंत पाटील एकाच झटक्यात भाजपला दोन धक्के देणार!


 

First Published on: August 27, 2021 8:31 AM
Exit mobile version