video viral: पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी घातला कंगनाच्या गाडीला घेराव, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

video viral: पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी घातला कंगनाच्या गाडीला घेराव, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सतत चर्चेत असते. आज पंजाबमध्ये रूपनगर-कीरतपुर साहिब मार्गावर अनेक शेतकऱ्यांनी कंगणाच्या गाडीला घेरलं होतं. शेतकऱ्यांनी कंगनाची गाडी थांबवत घोषणा करत होते. पंजाबमधील शेतकरी बांधवांवर कंगणाने वादग्रस्त वक्तव्यं केलेली होती. त्यामुळे जोपर्यंत कंगना या गोष्टीबाबत माफी मागत नाही. तोपर्यंत आम्ही तिच्या गाडीचा ताफा सोडणार नाही. अशा शेतकऱ्यांनी यावेळी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाब पोलिसांनी कंगनाची सुरक्षा वाढवली होती. परंतु शेतकऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे तिचा नाईलाज झाला. त्यानंतर कंगणाने अखेर शेतकऱ्यांची माफी मागितली. कंगनाने माफी मागितल्यानंतर तिच्या गाडीचा ताफा सोडण्यात आला.

पोलिसांनी शेतकऱ्यांना भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला. कंगनाने महिलांची माफी मागावी. अशा प्रकारची जिद्द शेतकऱ्यांनी केली. ते सांगत होते की, कंगणाने आमच्या महिलांची माफी मागितली पाहीजे. त्यानंतरच आम्ही तिला जाऊन देऊ. शेतकऱ्यांच्या प्रदर्शनामुळे चंदीगड आणि उना हायवे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रॅफिक झाल्यामुळे नंगल व्हाया उना हिमाचल प्रदेशात जाणाऱ्या गाड्या थांबल्या होत्या. परंतु कंगनाने माफी मागितल्यानंतर तिच्या गाडीचा ताफा सोडण्यात आला. कंगनाने माफी मागितल्यानंतर कारमधून खाली उतरत तिने लोकांचं अभिवादन केलं. यादरम्यान, तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक लोकांची आतुरता देखील वाढली होती.

शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कंगना सतत चर्चेत राहिली आहे. या प्रकरणात तिची तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. कंगनाने सुरूवात तिच्या ट्विटरवर एका पंजाबी वृद्ध महिलेचा फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तिने लिहिलं होतं की, अशी लोक ५०-५० रूपये घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी होतात. त्यानंतर शेतकऱ्यांनी तिला टार्गेट करण्यास सुरूवात केली. कंगनाच्या या टीकेला महिलांनी सुद्धा भडीमार केला होता. त्यानंतर तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनाचं ट्विटर अकाऊंट देखील बंद करण्यात आले होते.

जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर कंगनाने यावर नाराजी व्यक्त केली होती. कंगनाने सांगितलं होतं की, जर संसदेत निवडून दिलेल्या सरकार व्यतिरिक्त लोकांनी रस्त्यांवर कायदे बनवण्यास सुरूवात केली. तर हे राष्ट्र जिहादी बनेल. त्या सर्वांचं अभिनंदन, ज्या लोकांना हे पाहीजे आहे. कंगनाच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच तिच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. अनेक संघटनांनी तिच्याकडून पद्मश्री परत घेण्याची मागणी केली.


हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथसंपदेच्या छपाई कामाला गती द्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


 

First Published on: December 3, 2021 8:53 PM
Exit mobile version