अफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळले

अफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळले

अफगाणिस्तानमध्ये आज दुपारी दीडच्या सुमारास एरियाना अफगाण एअरलाईन्सचे एक प्रवासी विमान गजनी प्रांतात कोसळले आहे. ज्या भागात हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले तो तालिबानांच्या नियंत्रणाखाली आहे. दरम्यान, या विमानात एकूण ८३ प्रवासी होते. या अपघाताचे नेमके कारणही अजून समोर आलेले नाही.

First Published on: January 27, 2020 4:38 PM
Exit mobile version