afghanistan crisis : तालिबान विरोधकांना आश्रय दिलात तर… अफगाणी नेत्याची भारताला धमकी

afghanistan crisis : तालिबान विरोधकांना आश्रय दिलात तर… अफगाणी नेत्याची भारताला धमकी

afghanistan crisis : तालिबान विरोधकांना आश्रय दिलात तर.... अफगाणी नेत्याची भारताला धमकी

अफगाणिस्तानमधील पंजशीर वळगता तालिबानने संपूर्ण देशावर वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर तालिबानने सत्तास्थापनेसाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र अफगाणिस्तानावर तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. खास करुन तालिबान शेजारील राष्ट्र भारताविषयी काय भूमिका जाहीर करतयं याकडे नजर आहे. अशातच आता तालिबान नेत्याने भारताला पोकळ धमकी दिल्याचे समोर आले आहे. “तालिबान विरोधकांना भारतात आश्रय दिला तर महागात पडेल अशी धमकी अफगाणी नेते गुलबुद्दीन हेकमत्यार” यांनी दिली आहे.

एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीत गुलबुद्दीन हेकमत्यार यांनी, तालिबान विरोधकांना भारताने आश्रय देऊ न देता यापासून त्यांनी लांब राहिले पाहिजे. असे सांगितले. तर काश्मीर मुद्द्यावर भाष्य करताना हेकमत्यार म्हणाले की, “अफगाणिस्तान आणि त्यांच्या नव्या राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्नामध्ये रस नाही. तसेच अफगाणिस्तान भूमीचा वापर इतर देशांना करु देणार नाही. भारतानेही याबाबत भीती बाळगू नये.” त्यांनी पुढे असंही सांगितले की, “अफगाणिस्तानवर सत्ता मिळण्यात दोन देशांना अपयश आले. या अपयशाचा भारताने पुनर्विचार करत अशी ऐतिहासिक चुका भरुन काढाव्या.”

“भारताने आता अफगाणिस्तानबद्दल सकारात्मक भूमिका घ्यावी. कारण यापूर्वी त्यांनी सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेला देशांनी केलेल्या हल्ल्यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे गेल्या चार दशकातील चुका भारताने दुरुस्त कराव्यात, तर विदेशी राजवटींचं समर्थन करुन नये.” असेही ते म्हणाले.

७२ वर्षीय हेकमत्यार यांच्यावर १९९२ ते १९९६ दरम्यान काबुलमध्ये हजारो नागरिकांना ठार मारल्याचे आरोप आहेत. यानंतर २०१७ मध्ये अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अशरफ घनी यांनी हेकमत्यार यांनी माफी दिली होती. हेकमत्यार दोन वेळा अफगाणिस्तानचे पंतप्रधान देखील होते. त्यांनी जून १९९३ आणि जून १९९६ मध्ये या वर्षात पंतप्रधानपदावर होते.

मात्र तालिबाननं अफगाणिस्तानर ताबा मिळवल्यानंतर काश्मीरबाबत मोठं वक्तव्य केल आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत तालिबान प्रवक्ता सुहैल शाहिन याने काश्मीरबाबत आपली भूमिका जाहीर केली होती.
त्यामुळे तालिबानपासून भारताने आता अधिक सावध भूमिका घेणं गरजेचे आहे. “आमच्याकडे काश्मीरमधील मुस्लिमांचा आवाज उचलण्याचा अधिकार आहे.”, असं वक्तव्य प्रवक्ता सुहैल शाहिन याने केले होते.


Afganistan Crisis: पंजशीर खोऱ्यात तालिबानविरोधात अहमद मसूदने केली युद्धाची घोषणा


 

First Published on: September 3, 2021 2:42 PM
Exit mobile version