अफगाणिस्तानची महिला गव्हर्नर सलिमा मजारी तालिबान्यांच्या ताब्यात

अफगाणिस्तानची महिला गव्हर्नर सलिमा मजारी तालिबान्यांच्या ताब्यात

अफगाणिस्तानची महिला गव्हर्नर सलिमा मजिरा तालिबान्यांच्या ताब्यात

अफगाणिस्तानची (Afghanistan)  महिला गव्हर्नर सलिमा मजारी (Salima Mazari ) हीला तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे. (Afghanistan female governor Salima Mazari is in Taliban custody) अखेरच्या क्षणापर्यंत सलिमा मजारी ही तालिबान्यांविरोधात उभी होती. प्रसंगाच्या वेळी तिने आपल्या हातात बंदूक देखील घेतली. तालिबान्यांच्या हल्ल्याला घाबरुन अफगाणिस्तानचे राष्ट्रपती त्याचप्रमाणे इतर नेते देखील आपला जीव वाचवून पळून गेले. मात्र सलिमा मजारी हे तालिबान्यांशी दोन हात करण्यासाठी शस्र आपल्या हाती घेतले होते. सलिमा मजारी ही अफगाणिस्तानची पहिली महिला गव्हर्नर होती. जिवाच्या आकांताने तालिबान्यांशी संघर्ष करुन अखेर सलिमा तालिबान्यांच्या हाती लागली.

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी आपले वर्चस्व प्रस्तापित केल्यापासून अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळत आहे. अनेक अफगाणी नागरिकांनी देश सोडून जाण्यासाठी आपल्या जिवाचा आकांत केला. अशा परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्रपती आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडून पळून गेले  तर तिथल्या उपराष्ट्रपतींनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले. अफगाणिस्तानात सत्ताबदल होत असताना पाकिस्तानचे काही दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये दाखल झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. पाकिस्तानच्या टोळ्या अफगाणिस्तानमध्ये घुसून तिथल्या जनतेची लुट करत आहेत.

सलिमा मजारी हिचा जन्म मूळचा इराणमधील आहे. मात्र सोव्हिएत युद्धावेळी ती अफगाणिस्तानमध्ये आली. तिथे तेहरान युनिव्हर्सिटीमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. मात्र त्यानंतर तिने अफगाणिस्तानच्या राजकारणात प्रवेश केला आणि तालिबान्यांनविरोधात दोन हात करण्यासाठी ती उभी राहिली.

तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर तिथे आपले सरकार तयार करण्याचे तालिबानचे प्रयत्न आहेत. तालिबानने त्यांच्या शासनात महिलांना स्वातंत्र्य मिळेल, अशी घोषणा केली आहे मात्र हे शरिया कायद्या विरोधात आहे. इतकेच नाही तर तालिबानने महिलांचा राजकारणात प्रवेश केला जाईल, असेही म्हटले आहे.


हेही वाचा – अफगाणि नागरिकांना मुस्लीम राष्ट्रातच ‘नो एन्ट्री’

First Published on: August 18, 2021 6:06 PM
Exit mobile version