नीरव मोदी नंतर घोटाळेबाज हितेश पटेलला अल्बानियात अटक

नीरव मोदी नंतर घोटाळेबाज हितेश पटेलला अल्बानियात अटक

हितेश पटेल यांना अल्बानियात अटक

आंध्रा बॅंकेद्वारे चालवण्यात येत असलेल्या काही बॅंकाना सुमारे ५ हजार कोटींचा गंडा घातलेल्या नितीन संदेसरा यांचा साथीदार परदेशात पळुन गेलेल्या हितेश पटेलला अल्बानियात अटक करण्यात आली आहे. ईडीकडून त्याच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी त्याला रेड कॉर्नर नोटीस देखील बजावण्यात आली होता. दरम्यान, हितेश पटेल हे घोटाळेबाज नितीन संदेसरा यांचे साथीदार आणि स्टर्लिंग ग्रुपच्या संचालक मंडळातील एक आहेत. हितेश पटेल यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमुळे या घोटाळ्यातील अणखी काही महत्वाच्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. अलीकडेच पीएनबी बॅंकेला १४ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे.

लवकरच भारताच्या ताब्यात

परदेशातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांच भारतात लवकरच प्रत्यर्पण करण्यात येणार आहे. गुजरातच्या बडोद्यातील स्टर्लिंग बायोटेक औषध कंपनीचे मालक नितीन संदेसरा यांना ५ कोटींचा बॅंक घोटाळा केल्या प्रकरणी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात दुबईत अटक करण्यात आली होती. आंध्रा बॅंकेद्वारे चालवण्यात येत असलेल्या काही बॅंक समूहात नितीन आणि त्यांचा भाऊ चेतन संदेसरा यांनी ५ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणातील त्यांचा साथीदार हितेश पटेल यांना ११ तारखेला ईडीकडून रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर २० मार्चला अल्बानियातील तपास यंत्रणा राष्ट्रीय गुन्हे अन्वेशन तिराना यांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

३१ कर्जबुडवे परदेशात

भारतात हजारो कोटींचे आर्थिक गैरव्यवहार आणि बॅंक घोटाळेकरुन भारतातून आतापर्यंत ३१ उद्योगपती देशाबाहेर गेले आहेत. विजय माल्या, हिरे व्यापारी निरव मोदी हे मुख्य घोटाळेबाज आहेत. दरम्यान, या घोटाळेबाज उद्योगपतींचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी परराष्ट्र मंत्रालयाने केली होती. नीरव मोदी, नितीन संदेसरा यांच्यावरील कारवाईमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला यश येताना दिसत आहे. हितेश पटेल यांच्यावरील अल्बानियातील कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांना भारताच्या ताब्यात देण्यात येणारा आहे.

 

 

First Published on: March 22, 2019 8:22 PM
Exit mobile version