…अन् अमेरिकेने संधी साधली, झाला अयमान अल जवाहिरी खात्मा!

…अन् अमेरिकेने संधी साधली, झाला अयमान अल जवाहिरी खात्मा!

काबूल : अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा (७१) खात्मा अमेरिकेने केला. जवळपास १० वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेन आणि आता अल जवाहिरीला ठार करून ११/७चा हिशेब अमेरिकेने चुकता केला आहे. अल जवाहिरी कुठे लपला आहे, याची माहिती अमेरिकेच्या सीआयएला मिळाली आणि त्यांनी संधी साधत त्याचा खेळ खल्लास केला.

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (११/७) अमेरिका या हल्ल्याचा मास्टरमामाइंड ओसामा बिन लादेन आणि या हल्ल्यात महत्त्वाचा सहभाग असलेल्या अल जवाहिरीच्या मागावर अमेरिका होती. पाकिस्तानच्या आबोटाबाद येथे २ मे २०११ रोजी अमेरिकेने लादेनचा खात्मा केला होता.

तर, ११/७च्या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली विमाने हायजॅक करण्यात जवाहिरीचा सहभाग होता. या हल्ल्यात सुमारे ३ हजार अमेरिकन नागरिक ठार झाले होते. त्यामुळे जवाहिरी देखील अमेरिकेला हवा होता. तो आधी पाकिस्तानात लपला होता. त्यानंतर तालिबान्यांनी कब्जा घेतल्यावर तो अफगाणिस्तानमध्ये परतला. अमेरिकेचे हेर त्याच्या मागावर होतेच. त्याच्या कुटुंबीयांना काबूलमध्ये गुप्तचरांनी पाहिले. नंतर काही महिने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तो अनेकदा बाल्कनीत येतो, हे त्यांनी पाहिले होते.

त्यानंतर जवाहिरीच्या एन्काउंटरची योजना अमेरिकेने आखली. तो बाल्कनीत आल्यावर सीआयएने रिपर ड्रोनमधून हेलफायर मिसाइल जवाहिरीवर डागले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अमेरिकी अधिकाऱ्यांनी केलेल्या या हल्ल्यात जवाहिरीचे कुटुंब सुरक्षित आहेत. तसेच, त्या घराचीही पडझड झाली नाही.

First Published on: August 2, 2022 3:57 PM
Exit mobile version