हैदराबादमध्येही ‘सैराट’!

हैदराबादमध्येही ‘सैराट’!

माधवी आणि नवदीप (सौजन्य- सोशल मीडिया)

तेलगंणात बापानेच जावयाची जातीच्या कारणावरुन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमध्ये आंतरजातीय विवाहातून आणखी एका जोडप्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. माधवी आणि नवदीप अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे मुलाच्या वडिलांनी मुलगी आणि जावयाला मारण्यासाठी सुपारी दिली होती. कपडे देण्याच्या बहाण्याने त्यांना बोलावून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सध्या इलाज सुरु आहे.

नेमकं काय झालं?

बुधवारी संध्याकाळी ४ वाजता माधवी (२१) आणि नवदीप (२४) या दोघांना माधवीच्या वडिलांनी नवे कपडे घेऊन देतो, असे सांगून बोलावून घेतले. ते बाईकवर बसले असताना मागून आलेल्या वडिलांनी त्यांच्यावर कोयत्याने वार वार केले. यात माधवी गंभीर जखमी झाली आहे. तर तिचा नवरा बिल्ला नवदीपच्या चेहऱ्यावर आणि मानेवर गंभीर दुखापत झाली आहे. १० दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.

१० दिवसांपूर्वीच त्यांनी लग्न केले होते.

लग्नाला होता विरोध

इरागड्डाच्या प्रेमनगर कॉलनीत राहणाऱ्या २४ वर्षी बिल्ला नवदीप याचे माधवीवर प्रेम होते. बिल्ला नवदीप दलित तर माधवी उच्च जातीतील असल्यामुळे त्यांच्या प्रेमाला विरोध होता. गेल्या ५ वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यांनी तिचे लग्न मामेभावासोबत करायचे नक्की केले होते. अखेर दोघांनी १० दिवसांपूर्वीच त्यांनी घराचा विरोध पत्करुन लग्न केले.

…अचानक वार केले

लग्न केल्याचा राग मुलीच्या घरातल्यांना होता.  त्यांनी तिच्याशी बोलणे सोडले होते. पण गेल्या दोन दिवसांपासून तिचे आई- वडिल बोलत होते. त्यांनी त्याला बोरबांदा येथे बोलावून घेतले. ही दोघे त्यांची वाट पाहत असताना तिचे वडिल मागे आले आणि त्यांनी बॅगेतून कोयता काढत नवदीपवर वार केले. ते पाहून माधवीने त्यांना ढकलले. तर त्यांनी माधवीवर देखील वार केले. मदतीसाठी तिने आरडाओरड केल्यानंतर लोक जमा झाली. त्यावेळी तिच्या वडिलांनी त्यांना धमकी देऊन पळ काढला.

First Published on: September 20, 2018 2:42 PM
Exit mobile version