टिकटॉकच्या बंदीनंतर ‘मित्रों’ सरस; दिवसाला होताहेत १० लाख व्हिडीओ अपलोड

टिकटॉकच्या बंदीनंतर ‘मित्रों’ सरस; दिवसाला होताहेत १० लाख व्हिडीओ अपलोड

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरुन भारत सरकारने ५९ चीनी apps वर बंदी घातली. यामध्ये टिकटॉकचा समावेश आहे. यामुळे आता टिकटॉक वापरणाऱ्यांनी आता टिकटॉक बंद झाल्यावर स्वदेशी apps कडे मोर्चा वळवला आहे. मित्रों आणि चिंगारी या स्वदेशी apps ला पसंती दिली आहे. मित्रों या स्वदेशी शॉर्ट फॉर्म व्हिडिओ app गूगल स्टोअरवरुन २५ लाखाहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आला आहे.

मित्रोंवर दररोज जवळपास १० लाख नवे व्हिडीओ अपलोड केले जातात. तर दर तासाला ४ कोटी व्हिडीओ पाहिले जात आहेत. शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या एप्रिल २०२० मध्ये मित्रों हे app लाँच केलं होतं. हे app सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरले आहे. हलक्या-फुलक्या विनोदांचा धागा पकडत लोकांनी त्यांचे नावीन्यपूर्ण व्हिडीओ ऑनलाईन शेअर करावेत, जेणेकरून लोकांची डिजिटल गुंतवणूक आणि मनोरंजन होईल, हाच या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ app च्या स्थापनेमागील उद्देश आहे.

मित्रों प्लॅटफॉर्मवर दररोज जवळपास १० लाख नवे व्हिडीओ तयार होताना पाहून आम्हाला खूप आनंद होतो आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांना असा डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, ज्यातून लोकांनी तयार केलेल्या शॉर्ट व्हिडीओद्वारे लोकांचं मनोरंजन होईल, असा आमचा उद्देश होता, असं मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल यांनी म्हटलं.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात


 

First Published on: July 8, 2020 10:46 PM
Exit mobile version