डीआरडीओकडून अग्नी – ५ ची यशस्वी चाचणी

डीआरडीओकडून अग्नी – ५ ची यशस्वी चाचणी

भारताच्या संरक्षण क्षेत्रात सर्वात यशस्वी क्षेपणास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्नी – ५ ची सहावी यशस्वी चाचणी रविवारी घेण्यात आली. या यशस्वी चाचणीमुळे भारताचे संरक्षण लष्कर अधिक बळकट झाली आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओकडून ही चाचणी घेण्यात आली आहे.

ओडिशा किनारपट्टीजवळ झाली चाचणी

ओडिशा किनारपट्टीजवळील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या बेटावर रविवारी सकाळी ही चाचणी घेण्यात आली. सकाळी बरोबर ९ वाजून ४८ मिनिटांनी समुद्रामध्ये काही अंतरावर निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी म्हणून अग्नी-५ ला सोडण्यात आले. यानंतर अल्पावधीतच क्षेपणास्त्राने आपल्या लक्ष्याचा वेध घेत, आपली क्षमता सिद्ध केली. ही चाचणी करत असताना भारतीय सैन्यातील अधिकारी, डीआरडीओचे प्रमुख अधिकारी आणि संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती हे यावेळी उपस्थित होते. चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्व जणांनी यासाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करून सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या.

अग्नी – ५ मध्ये अचूक मारा करण्याची क्षमता

अग्नी-५ च्या या यशस्वी चाचणीमुळे भारतीय क्षेपणास्त्राची मारक क्षमता कित्येक पट्टीने वाढली असून अग्नी-५ भारताच्या ‘अग्नी’ मोहिमेमधील क्षेपणास्त्राची पाचवी आवृत्ती आहे. याची मारक क्षमता ही ५ हजार किलोमीटर इतकी आहे. तसेच एकाच वेळी १ हजार ५०० किलोग्रॅम स्फोटके वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. त्यामुळे एका अणुबॉम्ब इतकी शक्ती अग्नी – ५ मध्ये आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञान, अतिउच्च नेव्हिगेशन सिस्टीम यामुळे अत्यंत जलद गतीने अचूक मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. या क्षेपणास्त्रामुळे आता चीन, पाकिस्तानसह युरोप आणि आफ्रिका खंडातील अनेक देश भारताच्या या क्षेपणास्त्राच्या मारक टप्प्यात आले आहेत

संपूर्ण भारतीय बनावटीचं क्षेपणास्त्र

हे क्षेपणास्त्र संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे. १७ मीटर लांब आणि पन्नास टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी ही २०१२ मध्ये घेण्यात आली होती. यामधून तब्बल दीड किलो वजनाचे अण्वस्त्र वाहून नेले जाऊ शकतात. हे क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी अडीज हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

 

First Published on: June 4, 2018 3:04 AM
Exit mobile version