Video: दलित आमदाराशी लग्न केल्यामुळं मुलीच्या बापानं केला आत्महत्येचा प्रयत्न

Video: दलित आमदाराशी लग्न केल्यामुळं मुलीच्या बापानं केला आत्महत्येचा प्रयत्न

आमदार प्रभू आणि पत्नी सौंदर्या

‘जाता नाही जात, ती जात’, असे म्हणतात ते काही खोटं नाही. भारतात अजूनही जात-पात बघून लग्न करण्याची परंपरा आहे. पण लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या कायदेमंडळावर आहे. त्यांनाही याचा फटका बसताना दिसतोय. तामिळनाडू राज्यातील AIADMK पक्षाच्या एका दलित आमदारासोबत ब्राह्मण मुलीने स्वतःच्या मर्जीने लग्न केल्यानंतर मुलीच्या बापाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. “आमदाराने आपल्या मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले आहे. तसेच त्यानेच आपल्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.” असा आरोप केला आहे. बापाचा विरोध असतानाही १९ वर्षीय मुलीने हे धाडसी पाऊल उचलले.

तामिळनाडूच्या कल्लाकुरिची मतदारसंघाचे आमदार ए. प्रभू यांनी सोमवारी आपली प्रेयसी सौंदर्या हिच्याशी विवाह रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र मुलीचे वडील एस. स्वामीनाथन यांनी आरोप केला आहे की, दोघांचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आता सौंदर्या १९ वर्षांची असल्यामुळे ती अल्पवयीन असतानाच तिच्यासोबत आमदाराने प्रेम केले. तर दुसऱ्या बाजुला आमदार प्रभू यांनी आरोप फेटाळून लावत सांगितले की, आम्ही केवळ मागच्या चार महिन्यांपासून प्रेमसंबंधात आहोत.

स्वामिनाथन पुढे म्हणाले की, “आमदार प्रभू हे त्यांच्याच घरात अनेक वर्षांपासून राहत आहेत. प्रभू यांना आपण मुलासारखं मानलं. मात्र त्याने माझा विश्वासघात केला. मी या लग्नासाठी होकार दिलेला नाही. सौंदर्याला फूस लावून लग्न करण्यात आले आहे. दोघांच्या वयात १७ वर्षांचे अंतर आहे.” त्यानंतर प्रभू यांनी आरोप फेटाळून लावताना स्वतःचा सौंदर्या सोबतचा एक व्हिडिओच व्हायरल केला आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, आमच्या प्रेमसंबंधाला केवळ चार महिने झाले आहेत. मी लग्नासाठी स्वामिनाथन यांची परवानगी मागितली होती. मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे आम्हाला नाईलाजाने त्यांना वगळून लग्न करावे लागले. यानंतरही राग अनावर झाल्याने स्वामिनाथन थेट प्रभू यांच्या घरात घुसले आणि त्यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले.

 

 

First Published on: October 6, 2020 5:17 PM
Exit mobile version