दिलासा! आता पाण्याने होणार कोरोनाचा खात्मा! ICMR ने दिली मंजुरी

दिलासा! आता पाण्याने होणार कोरोनाचा खात्मा! ICMR ने दिली मंजुरी

दिलासा! आता पाण्याने होणार कोरोनाचा खात्मा! ICMR ने दिली मंजुरी

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर आतापर्यंत रशियानेच लस तयार केल्याचा दावा केला आहे. या लसीबाबत अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. तसेच कोरोनावर अद्याप औषध देखील आलेले नाही. मात्र, अनेक औषध आहेत जी परिणामकारक ठरत आहेत. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. AIIMS-IIT मध्ये शिकलेल्या काही विद्यार्थ्यांनी एक टेक्नॉलॉजी तयार केली आहे. ज्याच्या सहाय्याने फक्त पाण्याचा वापर करुनच कोरोना व्हायरसचा खात्मा केला जाऊ शकतो.

पाण्यावर चालणारे यंत्र

विद्यार्थ्यांनी तयार केलेले डिव्हाईस हे पाण्यावर चालणारे आहे. हे अत्यंत स्वस्त मॉडेल असून पाण्याची कोठेही कमतरता नसल्यामुळे याचा सार्वजनिक ठिकाणीही सर्रास वापर केला जाऊ शकतो.

ICMRची मंजुरी

टेक्नॉलॉजी कोरोनाचा खात्मा करण्यात यशस्वी झाल्याने ICMRने मंजुरी दिली आहे. या टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल आणि रेडिएशन फ्री डिव्हाइसचा वापर करण्यात आला आहे. USFDA गाइडलाइन्सचे पालन करणारी ही देशातील एकमेव टेक्नॉलॉजी आहे.

कसे काम करते यंत्र

या टेक्नॉलॉजीमध्ये पाण्याच्या सुपर मॅग्निफाय क्वॉलिटीचा वापर करण्यात आला आहे. ऑप्टिमाइझ कंडिशनमध्ये ही टेक्नॉलॉजी पाण्याला अँटीव्हायरल बनवते. यानंतर या अँटी व्हायरल पाण्याची फवारणी केली जाते. मायक्रॉन साइजचे ड्रॉपलेट वातावरणात पसरतात. याने कोरोनासह इतर व्हायरसचाही खात्मा होतो. या टेक्नॉलॉजी सहाय्याने बायो टेरारिझमवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.

डॉ. शशी रंजन आणि देव्यान साहा २०१५ मध्ये अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊन दिल्ली येथील एम्समध्ये पोहोचले. देशाच्या सेवेत योगदान देण्याची त्यांची इच्छा आहे. यांनी तेथे बायोडिझाइन इनोव्हेशनचा अभ्यास केला होता. तर गेल्या पाच वर्षांपासून ते एम्सच्या सोबतीने काम करत आहेत.


हेही वाचा – चारधाम यात्रा आता होणार सोयीस्कर! रेल्वेमंत्र्यांनी Video ट्वीट करून दिली माहिती


First Published on: August 21, 2020 9:39 PM
Exit mobile version