Air Force Plan Crash: मध्यप्रदेशच्या भिंड येथे हवाई दलाचे विमान कोसळले, पॅराशुटमुळे वाचला पायलटचा जीव

Air Force Plan Crash: मध्यप्रदेशच्या भिंड येथे हवाई दलाचे  विमान कोसळले, पॅराशुटमुळे वाचला पायलटचा जीव

Air Force Plan Crash: मध्यप्रदेशच्या भिंड येथे हवाई दलाचे विमान कोसळले, पॅराशुटमुळे वाचला पायलटचा जीव

मध्यप्रदेशच्या भिंड येथे हवाई दलाचे विमान क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिराज २००० हे विमान नियमित प्रशिक्षणासाठी रवाना झाले होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील मनका बाग या गावात ही घटना घडली. विमान क्रॅश होताच विमानाचे हवेतच दोन तुकडे झाले. विमानाचे तुटलेले भाग हे घटनास्थळापासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशच्या सीमाजवळ असलेल्या उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यापर्यंत पोहचले होते. विमानातील फ्लाइट लेफ्टिनेंट पायलट अभिलाष हा या अपघातात मरता मरता वाचला. मिळालेल्या माहितीनुसार,पायलट अभिलाष हा एकटाच विमान चालवत होता. विमान क्रॅश होताच त्याने प्रसंगावधान दाखवत विमानात असलेल्या पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी मारली. पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारल्यानंतर पायलट अभिलाष जवळपास २-३ किलोमीटर दूर असलेल्या परशुराम जिल्ह्यातील शेतात जाऊन पडला. पायलट अभिलाष आता ठिक असून तो किरकोळ जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन अधिकारी तसेच अग्निशनदलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाल्याने विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले.विमान क्रॅश झाल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले आणि विमानाचे अनेक भाग वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले. हे सगळं चित्र पाहून गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. विमान क्रॅश झाल्यानंतर त्यांचे तुकडे गावातील लोकांच्या शेतात त्याचप्रमाणे अनेक घरांवर देखील पडले होते. विमान क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमा झाली होती. पोलीस आणि प्रशासन वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने गावातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास मोठी मदत झाली.

घटना घडली तेव्हा तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान क्रॅश झाल्यानंतर त्याला आग लागली आणि विमान जोरात खाली पडले. विमान ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला. पायटने  प्रसंगावधान दाखवत शेतात विमान क्रॅश केले अन्य कोणत्या ठिकाणी विमान क्रॅश झाले असते मोठी जिवीन हानी झाली असती असे त्यांनी म्हटले.


हेही वाचा – Travel Advisory : परदेशातून येणाऱ्यांना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक, केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स

First Published on: October 21, 2021 10:21 PM
Exit mobile version