एअर इंडियाच्या प्रत्येक प्रवासात आता ‘जय हिंद’

एअर इंडियाच्या प्रत्येक प्रवासात आता ‘जय हिंद’

पुलवामा हल्ल्याला भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर देशातील लोकांमध्ये जोश संचारला आहे. त्यातही विंग कमांडर यांच्या अभिनंदन वर्थमान यांच्या सुखरुप वापसीनंतर भारतीयांचा जोश ‘हाय’ झाला आहे. सध्या लोकांमध्ये देशभक्तीची लाट पसरली असून, लोक आपापल्या परीने शूर जवानांचं अभिवादन करत आहेत. दरम्यान, एअर इंडिया या विमान कंपनीकडूनही एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि सोबतच प्रवाशांच्यादृष्टीने हा निर्णय महत्वाचा असल्याचं सांगितलं जातंय. यापुढे एअर इंडियाच्या प्रत्येक विमान प्रवासामध्ये केबीन क्र्यू आणि कॉकपीट क्र्यूला प्रवास सुरु करण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या सूचना दिल्यानंतर ‘जय हिंद’ म्हणणं अनिवार्य असणार आहे. एअर इंडिया कंपनीकडून हा आदेशच देण्यात आला आहे. यानिमित्तामे विमानातून प्रवास करणारे प्रवासीही साहाजिकच जय हिंदचा नारा देतील. सोमवारी कंपनीने दिलेल्या पत्रकातून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली.

First Published on: March 5, 2019 11:03 AM
Exit mobile version