चेन्नई विमानतळावर सोने तस्कर गजाआड!

चेन्नई विमानतळावर सोने तस्कर गजाआड!

चेन्नई विमानतळावर सोने तस्कर गजाआड!

चेन्नई विमानताळावर चेन्नई सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाने मोठी कामगिरी केली आहे. या पथकाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन विदेशी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांकडे २४ किलो वजनाचे सोन्याचे बिस्कीटे सापडले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत. या तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल ८ कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी चेन्नई सीमाशुल्क विभाग पुढील तपास घेत आहे.

हेही वाचा – सोन्याची पेस्ट करुन तस्करी करणारी महिला अटकेत

याअगोदरही घडला आहे असा प्रकार

सोने तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याअगोदरही नोव्हेंबर महिन्यात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्कर करणाऱ्या एका महिलेला पुणे सीमाशुल्क विभागाने अटक केली होती. या महिलेने सोन्याची तस्करी करताना मोठी शक्कल लढवली होती. तिने पॉलिथिनच्या पिशवीतून सोन्याची पेस्ट आणली होती. तिच्या जवळ असलेल्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये २ किलो ७९१ ग्रॅम वजनाच्या सोन्याची पेस्ट आढळली होती. या सोन्याची किंमत ९० लाख ४४ हजार २३५ रुपये इतकी होती. या महिलेविरोधात सीमाशुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तिला अटक केली होती. १७ ऑगस्ट रोजी दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून तीन कोटी रुपयांची सोन्याची तस्करी करण्यात आली होती. या प्रवाशांकडे सोन्याची ८६ बिस्कीटे असल्याचे आढळून आले होते. या तस्करांना देखील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आले होते.

First Published on: January 12, 2019 12:43 PM
Exit mobile version