Airtel Plan : Airtel यूजर्संना झटका, प्रीपेड प्लॅन्स ५०१ रुपयांनी महागले

Airtel Plan : Airtel यूजर्संना झटका, प्रीपेड प्लॅन्स ५०१ रुपयांनी महागले

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने यूजर्सला मोठा झटका दिला आहे.  कंपनीने आता आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतींमध्ये २५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे एअरटेलचे प्रीपेड प्लॅन्स आता जवळपास २० रुपयांपासून ते ५०१ रुपयांनी महागले आहेत. ही नवी दरवाढ २६ नोव्हेंबरपासून लागू होईल. यापूर्वी जुलैमध्ये कंपनीने पोस्टपेड प्लॅन्सच्या किंमतींमध्येही वाढ केली होती.

७९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आता ९९ रुपये

एअरटेलने ७९ रुपये किंमतीच्या प्लॅनमध्ये २० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी ७९ रुपयांना मिळणारा प्लॅन आता ९९ रुपये झाला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला ९९ मिनिटांच्या टॉकटाइमसह २०० एमबी डेटा मिळतोय. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे.

१४९ रुपयांचा प्लॅन मिळणार १७९ रुपयांना

२८ दिवसांसाठी १४९ रुपयांना मिळणारा प्लॅन आता १७९ रुपये झाला आहे. या प्लॅनच्या सब्सक्राइबर्सला देशात कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी अनलिमिटेड ट्रू कॉलिंग बेनिफिट्स दिले जात होते. यूजर्सला रोज १०० मेसेजसह या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा मिळत होता.

२१९ रुपयांचा प्लॅन २६५ रुपयांना

सर्वाधिक पॉप्यूलर प्लॅन्सपैकी एक असणारा २१९ रुपयांचा प्लॅन आता २६५ रुपये झाला आहे. या प्लॅन

मध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह डेली १०० एसएमएस आणि १ जीबी डेटा मिळतो.

Airtel Plan : Airtel यूजर्संना झटका, प्रीपेड प्लॅन ५०१ रुपयांनी महागले

२४९ चा प्लॅन आता २९९ रुपये

यानंतरचा २४९ रुपये किंमतीचा दुसरा पॉप्युलर प्लॅन देखील ५० रुपयांनी महागला आहे. त्यामुळे या प्लॅनसाठी आता युजर्सला २९९ रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली १०० फ्री एसएमएस आणि डेली १.५ जीबी डेटा दिला जातो.

३७९ चा प्लॅन आता ४५५ रुपये झाला

यानंतर ३७९ रुपयांचा प्लॅन आता युजर्सला ४५५ रुपये किंमतीने खरेदी करावा लागणार आहे. ८४ दिवसांच्या वैधता असलेला हा प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० फ्री एमएमएस आणि ६ जीबी डेटा दिला जात होता.

५९८ रुपयांचा प्लॅन १२१ रुपयांनी महागला

एअरटेल कंपनीने ५९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये तब्बल १२१ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ५९८ रुपयांच्या प्लॅनसाठी युजर्सला आता ७१९ रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅन मध्ये १.५ जीबी डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री मेसेजची सुविधा आहे.

यानंतर १००० रुपये किंमतीच्या वर असलेले प्लॅन देखील जवळपास ५०० रुपयांनी महाग झाले आहेत. त्यामुळे या प्लॅनच्या किंमतींमध्ये जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे. यापूर्वी Reliance Jio आणि Vodafone कंपनीने देखील आपल्या प्लॅनमध्ये वाढ केल्याची घोषणा केली.


 

First Published on: November 22, 2021 11:57 AM
Exit mobile version