मेडिकल दुकानांचे आज शटर डाऊन; देशव्यापी संपामुळे रुग्णांचे हाल

मेडिकल दुकानांचे आज शटर डाऊन; देशव्यापी संपामुळे रुग्णांचे हाल

औषधविक्रेत्यांचा देशव्यापी संप

औषधाची ऑनलाईन विक्री आणि ई-फार्मसीविरोधात आज देशभरातील औषध विक्रेते संपावर गेले आहेत. एकदिवशीय संपावर गेल्यामुळे आज देशभारातील मेडिकल स्टोर्स बंद राहणार आहे. एआयओसीडी या देशभरातील केमिस्ट आणि वितरकांच्या कंपनीने बंदची हाक दिली आहे. औषध विक्रीसाठी ई-फार्मसीचा ठोस मसुदा तयार करण्यात आला आहे. पण, या मसुद्यात औषध विक्रेत्यांचा विचार करण्यात आला नसल्याचे सांगत याच जाहीर मसुद्याविरोधात आज देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहे. गुरुवारी मध्यरात्री १२ पासून ते शक्रवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा संप असणार आहे. त्यामुळे दिवसभरामध्ये आज रुग्णांना औषध न मिळाल्यामुळे त्यांचे हाल होणार आहे.

संपामुळे रुग्णांचे हाल

देशभरातील ८ लाख मेडिकल स्टोअर्स आज बंद राहणार आहेत. या संपामध्ये मुंबईतील साडेसहा हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, द रिटेल अँड डिस्पेन्सिंग केमिस्ट असोसिएशन या संघनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. औषधांच्या किंमतीत सवलत देत औषधे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन कंपन्यांच्या माध्यमातून ई-फार्मसी सुरू करण्यात आली. या संपामुळे रुग्णांचे हाल होणार आहे.

लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो

ई-फार्मसीमुळे औषधे सहज उपलब्ध होऊ शकतात. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असा आक्षेप औषध विक्रेत्यांनी घेतला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील तरुण पिढीचे यामुळे त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी औषध विक्रेत्यांसह फार्मासिस्टनीही ठाम भूमिका घेण्याच्या दृष्टीने हा संप पुकारला आहे.

स्टोअरला काळ्या फितीलावून बंदला पाठिंबा

औषधविक्रेत्यांनी देशभरात जरी संप पुकारला असला, तरी महाराष्ट्रात मात्र शर्टवर काळ्या फिती लावून औषध दुकानांमध्ये कर्मचारी काम करतील, असे राज्यातील औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. तर मुंबईमध्ये सकाळपासून काही ठिकाणी मेडिकल सुरु आहेत तर अनेक मेडिकल बंद ठेवण्यात आली आहेत.

First Published on: September 28, 2018 10:10 AM
Exit mobile version