Karnataka Election : लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंच्या आशीर्वादासाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ

Karnataka Election : लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंच्या आशीर्वादासाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ

मुंबई | कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. कर्नाटक निवडणुकीत लिंगायत समाजाचे (Lingayat Samaj) मत मिळवण्यासाठी सर्व पक्षातील नेते प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीर कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या दोन मोठ्या प्रमुख मठात सर्व पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळण्यासाठी सर्व नेते मंडळी आशीर्वाद घेण्यासाठी लिंगायत समाजाच्या मठात गर्दी करत आहेत.

कर्नाटकात सत्ताधारी भाजप पक्ष, काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) आणि जेडीएस हे विरोधी पक्ष आहेत. या सर्व पक्षांतील नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या आहेत. या निवडणुकीत लिंगातय समाजावर सर्वांच्या नजरा लागू राहिल्या आहेत. या निवडणुकीत लिंगायत समाजातील शीर्षस्थानी असलेल्या दोन मठ चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहेत.

दरम्यान, २०१८ सालीच्या निवडणुकीत भाजपला सहज विजय मिळवून देणारा लिंगायत समाज आता कोणत्या बाजूल आहे , हे अद्यपही समजू शकले नाही. पण, लिंगायत समाज हा भाजपचा पंरपरागत समर्थक मानला जातो. या निवडणुकीत विरोधी पक्षाने देखील लिंगायत समाजातील नेते आणि त्यांच्या धर्मगुरूंशी जवळीक साधण्यास कोणतीही कसर ठेवली नाही.

भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टीर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी, नेहरू ओलेकर, गोपालकृष्ण यासारख्ये लिंगायत नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपला निवडणुकीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहेत. जगदीपश शेट्टार यांनी लिंगायत समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी अनेक धर्मगुरूंची भेट घेतल्या.

कोणाचीही सत्ता आली तरी आरक्षणात वाढ व्हावी 

कर्नाटक राज्यात कोणाची सत्ता आली तरी लिंगात समाजाच्या आरक्षणात वाढ झाली पाहिजे. लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंनी सांगितली की, कोणत्याही राजकीय पक्षावर उघडपणे टीका किंवा समर्थन करणार नाही, असे स्पष्ट मत कुडलसंगम पंचमशाली पीठाचे संत बसव जय मृत्युंजय स्वामींनी व्यक्त केले आहे.

मृत्युंजय स्वामी पुढे म्हणाले, “सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सरकारने (२०१३ ते २०१८) केंद्राला जैन आणि बौद्ध धर्माप्रमाणे लिंगायत समाजाला सुद्धा अल्पसंख्याक दर्जा देण्याची शिफारस केली होती. परंतु, केंद्र सरकारने लिंगायत समाजाचा प्रस्ताव न स्वीकारला नाही. तसेच लिंगातय समाजाला लवकरच अल्पसंख्याक दर्जा मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले असून राज्यात लिंगायत समाजाची संख्या १७ टक्के आहे.

टिळक आणि गांधीची मठाला भेट

 

First Published on: May 8, 2023 1:07 PM
Exit mobile version