जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस आज अंतराळ सफर करणार

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस आज अंतराळ सफर करणार

प्रातिनिधिक फोटो

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि Amazon चे संस्थापक जेफ बेजोस आज अंतराळ सफर करून इतिहास रचणार आहेत. ते स्वतःच्या रॉकेटने अंतराळात उड्डाण घेणार आहेत. रिचर्ड ब्रँडसन यांच्यानंतर जेफ बेजोस यांच्या अंतराळ प्रवासाकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. ६ जणांच्या टीमसोबत ११ मिनिटांचा अंतराळ प्रवास बेजोस करणार आहेत.

इन्स्टाग्रामवर सोमवारी बेजोस त्यांनी सांगितले आहे की, ‘२० जुलै ते अंतराळात उड्डाण करणार आहेत. टेक्सास येथून अंतराळात थोड्या वेळासाठी प्रवास केला जाणार आहे. तसेच २० जुलैला अपोलो-११ चंद्रावर जाण्याचा वर्धापनदिन देखील साजरा केला जाणार आहे.’ ११ मिनिटांच्या या अंतराळ प्रवासामध्ये चार मिनिटासाठी कॉर्मन लाइनच्या वर जाईल. कॉर्नन रेखा पृथ्वीच्या वायुमंडल आणि अंतराळ दरम्यान मान्यताप्राप्त सीमा आहे. म्हणजेच ही एक पृथ्वी आणि वायूमंडल आणि बाह्य अंतरिक्ष या दरम्यानची सीमा बॉर्डर लाइन आहे.

‘पृथ्वीला अंतराळातून पाहणे, तुम्हाला बदलून टाकते. या ग्रहासोबतचे नाते तुमचे आयुष्य बदलते. मला या उड्डाणातून प्रवास करण्याची इच्छा आहे. कारण ही एक अशी गोष्ट आहे, जी मला माझ्या आयुष्यात करायची होती. हे फार रोमांचक असणार आहे. हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मी ५ वर्षांचा असल्यापासून माझे अंतराळात जाण्याचे स्वप्न होते. २० जुलै रोजी मी माझ्या भावासोबत हे स्वप्न साकार करणार आहे आणि हे माझ्या चांगल्या मित्रांसोबतचे सर्वात खास क्षण असणार आहे,’ असे जेफ बेजोस म्हणाले.

दरम्यान फेब्रुवारी महिन्यात बेजोस यांनी इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि कंपनी ब्लू ओरिजिनवर जास्त लक्ष्य केंद्रित करण्यासाठी Amazonचे सीईओ पद सोडू इच्छित आहेत असे सांगितले होते. २७ वर्षांपूर्वी ५ जुलै १९९४ साली जेफ बेजोस यांनी एक छोट्याशा गॅरेजमध्ये Amazon सुरू केले होते. परंतु आज Amazon जगातील टॉप ५ कंपनीपैकी एक आहे.


हेही वाचा – ज्या दिवशी Amazon सुरू केले, त्याच दिवशी Jeff Bezos यांनी CEO पद सोडले, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास


First Published on: July 20, 2021 12:01 PM
Exit mobile version