India- China Border: गलवानमधील घुसखोरीविरोधात कायद्यात दुरुस्ती, अमेरिकेची मंजूरी!

India- China Border: गलवानमधील घुसखोरीविरोधात कायद्यात दुरुस्ती, अमेरिकेची मंजूरी!

अमेरिकेच्या प्रतिनीधीगृहाने गलवान खोऱ्यातील चीनच्या हिंसक घुसखोरीचा सोमवारी एकमताने निषेध केला. या मुद्द्याशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकृतता कायद्यातील (एनडीएए) दुरूस्ती अमेरिकी प्रतिनिधिगृहाने मंजूर केली. दक्षिण चीन सागरातील वाढत चाललेल्या वर्चस्वाविरोधातही चिंता व्यक्त केली.

काय आहे ‘एनडीएए’

काँग्रेसचे सदस्य स्टीव्ह शॅबट यांनी भारतीय वंशाचे सदस्य आमी बेरा यांच्याबरोबर ‘एनडीएए’ सुधारणा तरतूद मांडली होती. ती एकमताने संमत झाली आहे. भारत आणि चीन यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव चर्चेच्या मार्गाने कमी करण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी अनेक सुधारणा मान्य करण्यात आल्या. अमेरिकी काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनीही यावेळी चीनच्या धोरणांचा निषेध केला. भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, दक्षिण चीन सागर, जपानमधील सेन्काकू बेटे या भागात चीन मिळवू पाहत असलेले वर्चस्व हा चिंतेचा विषय आहे, यावर एकमत झाले.

‘एनडीएए’ सुधारणा तरतूदीत काय मांडले

चीनने कोरोना साथीचा गैरफायदा घेत भारताचा प्रदेश गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे चीनचा दक्षिण चीन सागरातही सेन्काकू बेटे बळकावण्याचा प्रयत्न चालवला आहे. चीनच्या वाढत्या प्रादेशिक विस्तारवादाची आम्हाला चिंता वाटते, असे ‘एनडीएए’ सुधारणा तरतुदीत मांडण्यात आले. दक्षिण चिनी समुद्राच्या जलाशयावर, त्यातून जाणाऱ्या जलमार्गावर आणि तेथील सागरी-खनिज संपत्तीवर चीन दावा करीत असल्याबद्दल या कायद्यात टीका करण्यात आली.

डोनाल्ड ट्रम म्हणतात…

कोनाचा जगभर झालेल्या फैलावावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चीनला लक्ष केलं. कोरोनाचा विषाणूचा प्रसार चीनला रोखता आला असता मात्र हा विषाणू चीनने जगभर पसरू दिला. असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

First Published on: July 22, 2020 7:35 AM
Exit mobile version