‘गर्भवती महिलांना व्हिसा देणार नाही’, ट्रम्प प्रशासनाचे व्हिसासाठी निर्बंध कायम!

‘गर्भवती महिलांना व्हिसा देणार नाही’, ट्रम्प प्रशासनाचे व्हिसासाठी निर्बंध कायम!

अमेरिकी व्हिसा प्रक्रियेत ट्रम्प शासनाने पुन्हा एकदा बदल केले आहेत. ‘बर्थ टूरिझम’ला आळा घालण्यासाठी अमेरिकेत केवळ प्रसूतीकरीता येणाऱ्या महिलांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसूती अमेरिकेत झाल्यास, जन्मलेल्या बालकास आपसूकच अमेरिकेचे नागरिकत्व देण्यात येते. परदेशातून अनेक महिला अमेरिकेत केवळ प्रसूतीसाठी येत असतात.

अमेरिकेत केवळ प्रसूतीकरीता येणाऱ्या महिलांमध्ये रशिया, चीन मधून येणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. परराष्ट्र विभागाच्या माहितीनूसार नवे नियम हे शुक्रवारपासून लागू करण्यात येतील तर अमेरिकेत उपचाराकरिता येणाऱ्या अन्य परदेशी नागरिकांप्रमाणे आता गर्भवती महिलांनादेखील वागवण्यात येणार आहे. तसेच व्हिसाकरिता अर्ज करणाऱ्या महिलांकडे खरच उपचारासाठी तितके पैसे आहेत का? हे पाहण्यात येणार आहे. सध्या अमेरिकेत प्रसूतीकरिता येण्यास परवानगी असली, तरीही यामुळे व्हिसा प्रक्रियेत होणारी अफरातफर तसेच ‘बर्थ टूरिझम’ सारखे प्रकार थांबवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

काय आहे ‘बर्थ टूरिझम’

अमेरिकेत अनेक कंपन्या या ‘बर्थ टूरीझम’ हा व्यवसाय करतात. जाहिराती देऊन हा व्यवसाय केला जात असून याकरिता तब्बल ८० हजार डॉलर देऊन अमेरिकेत वैद्यकिय उपचार, हॉटेलची सुविधा पुरवण्यात येते.

First Published on: January 24, 2020 11:11 PM
Exit mobile version