कोरोनाच्या संकटात स्वाईन फ्लूही बळावला; जुलैपर्यंत २ हजार रूग्ण, ४४ जणांचा मृत्यू

कोरोनाच्या संकटात स्वाईन फ्लूही बळावला; जुलैपर्यंत २ हजार रूग्ण, ४४ जणांचा मृत्यू

देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना आणखी एक विषाणू संसर्ग नागरिकांचा बळी घेत आहे. तब्बत दहा दशकांपूर्वी भारतात आलेल्या स्वाईन फ्लूच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून यावर्षी भारतात जुलैपर्यंत स्वाईन फ्लूचे २ हजार ७२१ रुग्ण आढळून आले आहेत. तर या विषाणूमुळे ४४ जणांचा मृत्यू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात झाला आहे. नॅशनल सेंट्रल फॉर डिसिस (NCDC) यांच्यामार्फत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार ३१ जुलै २०२० पर्यंत H1N1 चे २ हजार ७२१ रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे कर्नाटक (४५८), तेलंगणा (४४३), दिल्ली (४१२), तामिळनाडू (२५३) आणि उत्तर प्रदेश (२५२) या राज्यांमध्ये आढळून आले आहेत.

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा विषाणू डुग्गर या प्राण्यांमध्ये प्रथमता आढळून आला होता. मात्र आता माणसांमध्ये या विषाणूने शिरकाव केला आहे. सर्दी आणि कफ झालेल्यांकडून या आजाराचा संसर्ग होत असून या आजाराचीही ताप, कफ, घशातील सूज, अंगदुखी, सर्दी ही लक्षणे आहेत. या आजाराचा संसर्ग सर्वाधिक होण्याची शक्यता गरोदर महिला, पाच वर्षांखालील मुलं, गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अधिक असतो, असेही तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा –

चाकरमान्यांची परतीच्या प्रवासासाठी एसटीला पसंती; १७७ बसेसचे आरक्षण झाले फुल!

First Published on: August 18, 2020 4:37 PM
Exit mobile version