दिल्ली हिंसाचार रोखण्यात अपयश, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

दिल्ली हिंसाचार रोखण्यात अपयश, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

कॉंग्रेस शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले

दिल्ली हिंसाचार प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्लीमध्ये केंद्र सरकार हे संपुर्ण परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल आहे. तसेच नव्याने सत्तेत आलेल केजरीवाल यांच्या सरकारनेही मुक राहण्याची भूमिका घेतली अशी टीका त्यांनी यावेळी केली. राष्ट्रपती भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी दिल्ली हिंसाचारावर भाजपवर टीका केली.

दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात अमित शहा यांना अपयश आले आहे, त्यामुळेच गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी सोनिया गांधी यांनी यावेळी केली. दिल्ली हिंसाचार प्रकरणात आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. संपुर्ण देशासाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे. तसेच भारताची प्रतिमा मलीन करणारी घटना असल्याचे सोनिया गांधी यावेळी नमुद केले. संपुर्ण दिल्ली दंगलीच्या प्रकरणात तातडीने उपाययोजना करण्याएवजी केंद्र सरकार आणि दिल्लीतले सरकार यांनी मूक भूमिका घेतल्यासाठी त्यांनी दोन्ही सरकारांवर टीका केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. रोजगार गेले तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. म्हणूनच देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य अबाधित रहावे यासाठीची विनंती राष्ट्रपतींना करणारे निवेदन राष्ट्रपतींना दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही हे निवेदन राष्ट्रपतींना दिले आहे. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळात राज्य सभेचे विऱोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अहमद पटेल आणि रणजित सुरजेवाला यांचा समावेश होता.

दिल्लीमध्ये गेल्या चार दिवसांमध्ये जे काही घडले आहे ते अतिशय गंभीर आहे. संपुर्ण देशाला लाजवणारी अशी गोष्ट आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलीन करणारी ही गोष्ट असल्याचा उल्लेख कॉंग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी यावेळी केला. या संपुर्ण घटनेत ३४ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. संपुर्ण परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: February 27, 2020 1:37 PM
Exit mobile version