कोरोना व्हायरस मानवी विष्ठेवर जिवंत राहतो, माशीद्वारे पसरू शकतो – अमिताभ बच्चन

कोरोना व्हायरस मानवी विष्ठेवर जिवंत राहतो, माशीद्वारे पसरू शकतो – अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

बॉलिवडूचे अभिनेते अमिताभ बच्चन हे केंद्र सरकारच्या अनेक योजना आणि उपक्रमांचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. स्वच्छ भारत योजनेसाठी त्यांनी आजवर अनेकदा जाहीरात केली आहे. करोना विषाणूची जनजागृती करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मानवी विष्ठेवर माशी बसून करोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, असे सांगितले आहे.

हा दावा करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी द लांसेट या सर्वेक्षणाचा हवाला दिला आहे. चीनच्या एका अभ्यासानुसार मानवी विष्ठेत करोना व्हायरस जिवंत राहू शकतो, असे निदर्शनास आले होते. जर या विष्ठेवर जर माशी बसली तर हा विषाणू आणखी वेगाने पसरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन शौचालयाचा वापर करत मोकळ्या जागेवर शौचास बसणे सोडले पाहीजे, असे आवाहन केले आहे.

या आवाहनाचा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हात धुणे, सोशल डिस्टसिंग सारखे पर्याय लोकांनी वापरावेत, असेही सांगितले आहे.

भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता वेगाने पसरायला सुरुवात झाली आहे. सध्या भारतात ६४७ करोनाचे रुग्ण आहेत. तर ११ रुग्णांचा मृत्यू यामुळे झाला आहे.

First Published on: March 25, 2020 10:49 PM
Exit mobile version