अमूलकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्लॅस्टिक स्ट्रॉवर बंदी घालण्याचे आवाहन, जाणून घ्या कारण?

अमूलकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्लॅस्टिक स्ट्रॉवर बंदी घालण्याचे आवाहन, जाणून घ्या कारण?

भारतातील सर्वात मोठी डेअरी अमूलने (Amul) एक पत्र लिहून मोदी सरकारला प्लास्टिक स्ट्रॉवरील नियोजित बंदीबाबत (Plastic Straw) एक विनंती केली आहे. अमूलने म्हटले आहे की, प्लॅस्टिक स्ट्रॉवर बंदी आणल्यानंतर शेतकरी आणि जगातील सर्वात मोठा कमोडिटी उत्पादक असलेल्या दुधाच्या वापरावर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. मिळालेल्या माहितीनुसार, अमूलने २८ मे रोजी पीएमओला लिहिलेल्या पत्रात असं आवाहन केले आहे.

पत्रात असे म्हटले आहे की, सरकार १ जुलैपासून ज्यूस आणि दुग्धजन्य पदार्थांच्या प्लास्टिक स्ट्रॉवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे, त्याचा उद्योग ७९० दशलक्ष (७९ कोटी) आहे. अमूल दरवर्षी कोट्यवधींमध्ये लहान डेअरीचं कार्टन विकतं, ज्यामध्ये प्लास्टिकचे स्ट्रॉ असतात.

हेही वाचा : Milk Price Hike : दुधाच्या दरात पुन्हा मोठी वाढ, अमूलने सांगितले ‘या’ दरवाढीमागचे कारण

सरकारच्या या निर्णयामुळे अमूल, पेप्सिको इंक आणि कोका-कोला यासह जागतिक पेय कंपन्यांना धक्का बसला आहे. विशेषत: जेव्हा सरकारने आपली भूमिका बदलण्यास नकार दिला आणि कंपन्यांना पर्यायी स्ट्रॉकडे जाण्यास सांगितले, त्यामुळे या कंपन्यांना धक्का बसला आहे. अमूल, पेप्सिको, कोका-कोलाची यांसारखे बहुतेक पेयं पदार्थ प्लास्टिकच्या स्ट्रॉवर पॅक करून ग्राहकांना दिली जातात.

8 अब्ज डॉलर्सच्या अमूल डेअरी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आरएस सोढी म्हणाले की, प्लास्टिकच्या स्ट्रॉमुळे दुधाची अधिक खप होण्यास मदत होते. सोधी यांनी लिहिलयं की, स्ट्रॉ बंदीबाबत योग्य निर्णय घेतल्यास १० कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि फायदा होईल, ५ ते ३० रुपये किमतीचे ज्यूस, दुधाचे पदार्थ आणि शीतपेये देशात खूप लोकप्रिय आहेत. या शीतपेयांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. जर प्लास्टिकच्या स्ट्रॉवर बंदी घातली, तर कागदी स्ट्रॉ वापरल्यामुळे ही पेयं आणखी महाग होऊ शकतात.


हेही वाचा : पाकिस्तानात हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींवर अज्ञातांकडून हल्ला


 

First Published on: June 9, 2022 4:49 PM
Exit mobile version