देशातील १० कोटी लोकांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या PETA वर बंदी आणा

देशातील १० कोटी लोकांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या PETA वर बंदी आणा

देशातील १० कोटी लोकांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या PETA वर बंदी आणा, अमूल कंपनीची पंतप्रधानांकडे मागणी

प्राण्यांच्या संरक्षणासाठी पेटा( PETA) अर्थात पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स या भारतातील सर्वात मोठ्या सहकारी तत्वावर दूध उत्पादन करणाऱ्या अमूल कंपनीतील वाढ टोकाला पाहण्याची शक्यता आहे. कारण अमूल कंपनीने पेटा आंतरराष्ट्रीय संस्थेने देशातील १० कोटी कामगारांचा रोजगारावर गदा आणण्याचे प्रयत्न सुरु केल्याने लवकरात लवकर बंदी आणावी अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अमूलचे व्हाईस चेअरमन वालमजी हंबाल यांनी यासंदर्भातील मागणी केली आहे.

वेगन दूध तयार करा असा पेटाने दिलेला सल्ला म्हणजे देशातील सहकारी दूध उत्पादक संस्था नष्ट करण्याचा आणि देशातील रोजगार नष्ट करण्याचा डाव असल्याचा आरोप अमूलने केला आहे. अमूलसारख्या मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांची प्रतिमा मलिन करत त्या माध्यमातून देशातील १० कोटी कामगारांचे रोजगार नष्ट करण्याची योजन पेटाने आखली असल्याचे आरोपही अमूल कंपनीने केले आहेत.

अमूलने वेगन दूध निर्मिती करावी- पेटा

पेटाने एका पत्राद्वारे अमूल दूध निर्मिती संस्थेला एक अजब सल्ला दिला आहे. यात पेटाने म्हटले की, अमूल कंपनीने गाईच्या दूधाऐवजी वेगन दूधनिर्मिती उत्पादनांकडे वळावे. यातच अमूलचे भविष्य आहे असे पेटाने म्हटले आहे.

पेटाच्या या पत्राला उत्तर देत अमूलचे सीईओ आर. एस. सोढी यांनी लिहिले की, जर अमूल कंपनीने गाईच्या दुधाचे उत्पादन बंद केले तर भारतातील १० कोटी शेतकरी कामगारांचा रोजगार जाईल, त्यांना रोजगार कोण देणार? आपल्याला माहित नाही का बहुतेक दूध उत्पादक शेतकरी भूमिहीन आहेत. पेटाच्या या सल्ल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एकमेव साधन नष्ट होईल.आपल्या परंपरेत दुधाचा वापर आहे. त्यामुळे दुधाला वेगन दुधाचा पर्याय योग्य नाही.

परंतु यावर प्रतिउत्तर देत पेटाने लिहिले की, वेगन दुधाच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे रोजगार जाणार नाहीत उलट प्राण्यांवरील अत्याचार थांबवता येतील. यामुळे दुधामुळे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम देखील रोखता येतील. देशात सध्या गायींना दूध देण्यासाठी त्रास दिला जातो, त्यांना दुभतं ठेवलं जातं, जेव्हा त्यांचे शरीर दूध देणे बंद करते तेव्हा त्यांना कत्तलखान्यात विकलं जातं आणि मांस मिळवलं जातं’, असं पेटा इंडियाने म्हटले आहे.

वेगन दूध म्हणजे नेमकं काय ?

वेगन दुध सध्या जगभरातील अनेक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. वेगन दूध हे नारळ, काजू, बदाम आणि मुख्यतः सोया पासून बनवलं जातं. सध्या बाजारात अनेक नागरिक या दुधाला पसंती देत आहेत. गाईच्या दुधापेक्षा वेगन दूध हे जास्त फायदेशीर असल्याचा दावा पेटाने केला आहे.


 

First Published on: June 2, 2021 3:24 PM
Exit mobile version